सह्याद्री चौफेर | राजू डावे
राज्यातील युवकांच्या बेरोजगारीवर, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळण्याकरिता व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा व आर्थिक मदत मिळण्याकरिता तसेच सरकारी शाळा बंद करण्याच्या सरकारच्या धोरणाविरुद्ध आमदार रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वात युवकांचे प्रश्न घेऊन पद यात्रा काढण्यात आली.
"हा राजकीय प्रवास नाही. तरुणांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. जे संबंधित आहेत ते यात्रेत सामील होऊ शकतात,” रोहित पवार म्हणाले."
या संघर्ष यात्रेमध्ये वणी विधानसभा क्षेत्रामधून राष्ट्रवादी चे विजय नगराळे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष यवतमाळ, खुशाल बासमवार कार्यकारी तालुका अध्यक्ष वणी, गुणवंत टोंगे ओबीसी सेल अध्यक्ष वणी, तालुका रामकृष्ण वैद्य जिल्हा सरचिटणीस यवतमाळ व इतर कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये देवगाव जिल्हा अमरावती येथून पुलगाव पर्यंत पदयात्रेत सामील झाले आहे. या पदयात्रेचा समारोप नागपूर येथे होणार आहे असे जिल्हाध्यक्ष विजय नगराळे यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी वणी विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी संघर्ष यात्रेत सामील
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 06, 2023
Rating: