सह्याद्री चौफेर च्या वृत्ताची दखल : लाखापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : लाखापूर ते वनोजा देवी रस्त्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती. येथील ग्रामस्थांच्या मागणीला प्रशासन दरबारी मांडण्यासाठी सातत्याने सह्याद्री चौफेरने वृत्त प्रकाशित केले होते. अखेर सह्याद्री चौफेरच्या वृत्तची दखल घेत लाखापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. अशी येथील ग्रामस्थांनी माहिती दिली.
तालुक्यातील भांदेवाडा,लाखापूर ते वनोजा देवी या दयनीय अवस्था झालेल्या रस्त्याचे काम व्हावे या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी या रस्त्यासाठी 'सह्याद्री चौफेर'च्या माध्यमातून शासन प्रशासनाकडे गेल्या अनेक महिन्यापुर्वी मागणी होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाबाबत दुर्लक्ष करित असल्याचे गावाकऱ्यातून सांगितलं जात होत. येथील सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसेना तालुका संघटक प्रवीण भाऊ बलकी, यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांनी संबंधित विभागाच्या उदासीन धोरणाविरोधात उपोषणाचे हत्यार उपासणार, असे वृत्त प्रकाशित होताच संबंधित विभागाने या भागाची पहाणी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
त्यामुळे उशीर का होईना! कामाला सुरुवात झाली. याबाबत सह्याद्री चौफेर चे आभार प्रवीणभाऊ बलकी, संजय देवतळे, योगीराज बलकी, राजू डावे, हेमंत दानव, अमोल डावे, विनोद मेश्राम, गणेश धोबे, माजी सरपंच आकाश भोसले (डोल डोंगरगाव) यांच्या सह ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. या पुढेही असेच सहकार्य असावे, असे मत श्री प्रवीण बलकी यांनी 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना व्यक्त केले. 
सह्याद्री चौफेर च्या वृत्ताची दखल : लाखापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात सह्याद्री चौफेर च्या वृत्ताची दखल : लाखापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात Reviewed by सह्याद्री चौफेर on December 06, 2023 Rating: 5
Powered by Blogger.