शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळी

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यानुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी तसेच अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी दिली जाणार आहे.

या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेले अंडे अथवा अंडा पुलाव, बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्यात येईल. जे विद्यार्थी अंडी खात नाहीत अशा विद्यार्थ्यांना अंड्याऐवजी केळी अथवा अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक फळ उपलब्ध करून देण्यात येईल.

हा उपक्रम 23 आठवड्यांकरीता सुरू राहणार आहे. सद्यस्थितीत अंड्याचा बाजारभाव विचारात घेता एका अंड्यासाठी 5 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. ग्रामीण भागात शाळा व्यवस्थापन समितीमार्फत तसेच नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत आहार पुरविणाऱ्या, आहार शिजवणाऱ्या यंत्रणेमार्फत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ देण्यात येतो. या उपक्रमांतर्गत नियमित पोषण आहाराव्यतिरिक्त अतिरिक्त पूरक पौष्टिक पदार्थ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने अंड्यांमधील पौष्टिक मूल्यांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे यासंदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे.

गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार, आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार

सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर 

मुंबई : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना गणित, विज्ञानात पारंगत करण्यासाठी शिक्षकांची २८२ पदे भरण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यासाठी येणाऱ्या 30 कोटी खर्चास देखील आज मान्यता देण्यात आली.

इतर मागास व बहुजन कल्याण विभागामार्फत 141 कला व विज्ञान तसेच 7 कला व वाणिज्य अशी 148 उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. उच्चस्तरीय सचिव समितीने गणित आणि विज्ञान विषयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदे निर्माण करण्यात येतील.

आश्रमशाळेतील विद्यार्थी 12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्यावर वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य अशा व्यावसायीक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. त्यांना गणित आणि विज्ञानावर आधारित नीट आणि सीईटी सारख्या परिक्षांना सामोरे जावे लागते. आर्थिक परिस्थितीमुळे खासगी ट्यूशन आणि क्लासेस न मिळाल्याने हे विद्यार्थी स्पर्धेत टिकत नाहीत त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

रासा येथील घरकुल वाटपात होत आहे दुजाभाव, तक्रार दाखल- लढा संघटनेचा आरोप...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : रासा ग्रामपंचायत मध्ये घरकुल वाटपात प्रचंड घोळ असून प्रस्तावित यादी ही ग्रामसभेत मंजूर यादी प्राधान्य क्रमानुसार त्याची निवड करण्यात यायला पाहिजे होती परंतु  तस न करता सरपंच व सदस्य हे घरकुलचा लाभ आपल्या मनमर्जीतील लोकांना देत असल्याचा आरोप रासा गावातील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्या दालनात करून ह्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले.

केंद्र सरकार व राज्यसरकार यांनी वेगवेगळ्या समुदायतील लोकांना सर्वांसाठी घरे 2024 या शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घर देण्याचा स्वप्न स्थानिक लोकांना देण्यात आले आहे. परंतू ग्रामपंचायत स्तरावर मात्र मोठ्या स्वरूपात घोळ, स्तुती पाठक लोकांना व चिरमिरी देणाऱ्या लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. रासा येथील नागरिक व महिला यांनी ज्या फाईला तयार करायला सांगण्यात आले आहे त्यामुळे त्यांना झालेला खर्च हा व्यर्थ केला व आता आम्हाला घरकूल मिळणार नाही, असा दम गावातील सरपंच व सदस्यांनी दिला असा आरोप सुद्धा केलाला आहे. म्हणून ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून पीडित लोकांना न्याय देण्यात यावा ह्या साठी लढा संघटनेचे तर्फे निवेदन देण्यात आले. 

ह्यावेळी प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे, धनराज येसेकर,  गणेश उरकुडे लोकेश कोटनाके, अशोक सकीनावर विठ्ठल सकीनावर महादेव चटपल्लीवार सतीश हिवरकर  हनुमंत सकीनवार, मंगला सुरपाम, गंगाघर पंधरे, वामन उईके, देवानंद कोरवते, गावातील घरकुल लाभार्थी उपस्थित होते

बेरोजगार, भुमिहीन, मजूर व असंघटीत कामगार संघाचे तहसीलदार निलावाड यांना साकडे

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

मारेगाव : तालुक्यात रेतीघाटाचा लिलाव बंद असल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांच्या हाताला काम नाही. रेती अभावी सर्व कामे ठप्प पडली, बांधकाम कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील रेती घाट लिलाव तत्काळ करावा, अशा आशयाचे निवेदन काल (ता.7नोव्हे.) रोजी तहसीलदार उत्तम निलावाड यांना देण्यात आले.

मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे रेती डेपो आहे. डेपोतून रेती अनेक ठिकाणी आवागमन निरतंर होत आहे. मात्र, तालुक्यातील लाभार्थी असो की, संबंधित व्यावसायिक यांना रेतीच मिळत नसल्याने बांधकाम कामगार अक्षरशः रिकामे झाले आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच रेती व्यवसायावर अवलंबुन आहे. मागील वर्षीपासून तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे सर्व कुशल कामगार हाताला काम नसल्याने ठणठण गोपाल झाले आहेत. परिणामी संबंधित व्यावसायिक व बांधकाम कामगारांच्या कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली, त्यामुळे रेती घाट लिलावा व्हावा अशी मागणी बेरोजगार, भुमिहीन, मजूर व असंघटीत कामगार संघ, मारेगाव यांनी केली आहे.

मागील वर्षी पासुन बांधकाम कामगार,संबंधित व्यावसायिक कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली असुन, यावर्षी ची सुद्धा दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती दिसत आहे. भविष्यात बांधकाम कामगारांनी जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला असताना रेती अभावी तालुक्यातील सर्व विकास कामे ठप्प पडली आहे. रेती डेपो असून सुद्धा तो डेपो वांझोटा ठरत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीच्या आत रेती घाट लिलाव करावा किंवा बांधकाम कामगारांना दिवाळी भत्ता व दरमहा बेरोजगार भत्ता देण्यात यावा, अन्यथा सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर नाईलाजाने उपोषण करावे लागेल असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे. 

यावेळी बेरोजगार, भुमिहीन, मजूर व असंघटीत कामगार संघाचे प्रमोद कोसरे, सचिन कामटकर, किशोर केळझरकर, पंकज हरणे, मंगेश रामपुरे, वंचित चे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, मनोहर भोयर, गजानन मेश्राम, मोहन भोयर, प्रनय नैताम, ता. उपाध्यक्ष संजय जिवने, आकाश नावडे, गणेश टेकाम, रमेश कौटोती यांच्यासह शेकडो बांधकाम कामगार उपस्थित होते. 

मार्डी ते मारेगाव बस फेरी चालू करा - मनसेचे आगार प्रमुखांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बस अभावी बेहाल होत असून, येरजाऱ्या साठी अवैध खासगी वाहने जीवघेणे ठरत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी महामंडळ बस सेवा उपलब्ध करून द्यावी,यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेशभाऊ ढोके यांच्या नेतृत्वात परिवहन मंडळ वणी आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

मनसे व पालकांच्या या मागणीला परिवहन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मार्डी ते मारेगाव ही बस सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान, यांच्या उपस्थितीत आगार व्यवस्थापक कोरटकर यांनी दिली. त्यामुळे लवकरच मार्डी या परिसरातील विद्यार्थ्यांना महामंडळाची बस सेवा मिळणार आहे.

यावेळी अजिद शेख, उदय खिरटकर, अनंता जुमडे, गणेश क्षिरसागर, रोहित हस्ते, शुभम दाते यांच्या सह सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक व असंख्य शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.