रासा येथील घरकुल वाटपात होत आहे दुजाभाव, तक्रार दाखल- लढा संघटनेचा आरोप...

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : रासा ग्रामपंचायत मध्ये घरकुल वाटपात प्रचंड घोळ असून प्रस्तावित यादी ही ग्रामसभेत मंजूर यादी प्राधान्य क्रमानुसार त्याची निवड करण्यात यायला पाहिजे होती परंतु  तस न करता सरपंच व सदस्य हे घरकुलचा लाभ आपल्या मनमर्जीतील लोकांना देत असल्याचा आरोप रासा गावातील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वणी यांच्या दालनात करून ह्या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यात आले.

केंद्र सरकार व राज्यसरकार यांनी वेगवेगळ्या समुदायतील लोकांना सर्वांसाठी घरे 2024 या शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना घर देण्याचा स्वप्न स्थानिक लोकांना देण्यात आले आहे. परंतू ग्रामपंचायत स्तरावर मात्र मोठ्या स्वरूपात घोळ, स्तुती पाठक लोकांना व चिरमिरी देणाऱ्या लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. रासा येथील नागरिक व महिला यांनी ज्या फाईला तयार करायला सांगण्यात आले आहे त्यामुळे त्यांना झालेला खर्च हा व्यर्थ केला व आता आम्हाला घरकूल मिळणार नाही, असा दम गावातील सरपंच व सदस्यांनी दिला असा आरोप सुद्धा केलाला आहे. म्हणून ह्या प्रकरणी सखोल चौकशी करून पीडित लोकांना न्याय देण्यात यावा ह्या साठी लढा संघटनेचे तर्फे निवेदन देण्यात आले. 

ह्यावेळी प्रवीण खानझोडे, विकेश पानघाटे, धनराज येसेकर,  गणेश उरकुडे लोकेश कोटनाके, अशोक सकीनावर विठ्ठल सकीनावर महादेव चटपल्लीवार सतीश हिवरकर  हनुमंत सकीनवार, मंगला सुरपाम, गंगाघर पंधरे, वामन उईके, देवानंद कोरवते, गावातील घरकुल लाभार्थी उपस्थित होते
रासा येथील घरकुल वाटपात होत आहे दुजाभाव, तक्रार दाखल- लढा संघटनेचा आरोप... रासा येथील घरकुल वाटपात होत आहे दुजाभाव, तक्रार दाखल- लढा संघटनेचा आरोप... Reviewed by सह्याद्री चौफेर on November 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.