सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : तालुक्यात रेतीघाटाचा लिलाव बंद असल्यामुळे सर्व बांधकाम कामगारांच्या हाताला काम नाही. रेती अभावी सर्व कामे ठप्प पडली, बांधकाम कामगारावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील रेती घाट लिलाव तत्काळ करावा, अशा आशयाचे निवेदन काल (ता.7नोव्हे.) रोजी तहसीलदार उत्तम निलावाड यांना देण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे रेती डेपो आहे. डेपोतून रेती अनेक ठिकाणी आवागमन निरतंर होत आहे. मात्र, तालुक्यातील लाभार्थी असो की, संबंधित व्यावसायिक यांना रेतीच मिळत नसल्याने बांधकाम कामगार अक्षरशः रिकामे झाले आहे. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच रेती व्यवसायावर अवलंबुन आहे. मागील वर्षीपासून तालुक्यातील रेती घाटाचा लिलाव झाला नसल्यामुळे सर्व कुशल कामगार हाताला काम नसल्याने ठणठण गोपाल झाले आहेत. परिणामी संबंधित व्यावसायिक व बांधकाम कामगारांच्या कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली, त्यामुळे रेती घाट लिलावा व्हावा अशी मागणी बेरोजगार, भुमिहीन, मजूर व असंघटीत कामगार संघ, मारेगाव यांनी केली आहे.
मागील वर्षी पासुन बांधकाम कामगार,संबंधित व्यावसायिक कुटुंबाची दिवाळी अंधारात गेली असुन, यावर्षी ची सुद्धा दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती दिसत आहे. भविष्यात बांधकाम कामगारांनी जगावे कसे? असा प्रश्न निर्माण झाला असताना रेती अभावी तालुक्यातील सर्व विकास कामे ठप्प पडली आहे. रेती डेपो असून सुद्धा तो डेपो वांझोटा ठरत आहे. त्यामुळे येत्या दिवाळीच्या आत रेती घाट लिलाव करावा किंवा बांधकाम कामगारांना दिवाळी भत्ता व दरमहा बेरोजगार भत्ता देण्यात यावा, अन्यथा सर्व बांधकाम कामगारांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर नाईलाजाने उपोषण करावे लागेल असा गर्भीत ईशाराही देण्यात आला आहे.
यावेळी बेरोजगार, भुमिहीन, मजूर व असंघटीत कामगार संघाचे प्रमोद कोसरे, सचिन कामटकर, किशोर केळझरकर, पंकज हरणे, मंगेश रामपुरे, वंचित चे तालुका अध्यक्ष गौतम दारुंडे, मनोहर भोयर, गजानन मेश्राम, मोहन भोयर, प्रनय नैताम, ता. उपाध्यक्ष संजय जिवने, आकाश नावडे, गणेश टेकाम, रमेश कौटोती यांच्यासह शेकडो बांधकाम कामगार उपस्थित होते.
बेरोजगार, भुमिहीन, मजूर व असंघटीत कामगार संघाचे तहसीलदार निलावाड यांना साकडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 08, 2023
Rating: