टॉप बातम्या

मार्डी ते मारेगाव बस फेरी चालू करा - मनसेचे आगार प्रमुखांना निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बस अभावी बेहाल होत असून, येरजाऱ्या साठी अवैध खासगी वाहने जीवघेणे ठरत असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी महामंडळ बस सेवा उपलब्ध करून द्यावी,यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मारेगाव तालुकाध्यक्ष रुपेशभाऊ ढोके यांच्या नेतृत्वात परिवहन मंडळ वणी आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले.

मनसे व पालकांच्या या मागणीला परिवहन विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर मार्डी ते मारेगाव ही बस सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान, यांच्या उपस्थितीत आगार व्यवस्थापक कोरटकर यांनी दिली. त्यामुळे लवकरच मार्डी या परिसरातील विद्यार्थ्यांना महामंडळाची बस सेवा मिळणार आहे.

यावेळी अजिद शेख, उदय खिरटकर, अनंता जुमडे, गणेश क्षिरसागर, रोहित हस्ते, शुभम दाते यांच्या सह सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक व असंख्य शाळकरी विद्यार्थी उपस्थित होते.


Previous Post Next Post