सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
मारेगाव : केगाव चिंचमंडळ शिवारातील शेकडो शेतकऱ्यांची भूमी संपादित करून या शिवारात कॅनल निर्माण केले. मात्र गेल्या पंधरा वर्षांपासून केगाव चिंचमंडळ शिवारात बेंबळाचे पाणी पोहचले नसल्याने सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
बेंबळा प्रकल्पाच्या माध्यमातून हरित क्रांती व्हावी, शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहचवून त्यांचा आर्थिक स्तर वाढावा या उद्देशाने प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली, परंतु मारेगाव तालुक्यासाठी बेंबळा प्रकल्प पांढरा हत्ती ठरत असल्याने शेतकऱ्यात बोलल्या जात आहे.
बेंबळा प्रकल्प सुरू करताना अनेक शेतकऱ्यांना आपलेही शेत शिवार हिरवेगार होईल असे वाटू लागले होते. त्यासाठी लागणारी तालुक्यातील केगाव चिंचमंडळ सह इतर शिवारातील हजारो हेक्टर शेतजमीन प्रशासनाने हस्तगत करून सुरू झालेला प्रकल्प आज वांझोटा ठरत आहे. बेबळाचे तालुक्यातील अनेक ठिकाणी अर्धवटच काम झाले आहे त्यामुळे कॅनल मध्ये मोठमोठे वृक्ष वाढल्याने कॅनल मातीने बुजत आहे. मार्डी पासून समोर जाणाऱ्या बेंबळा प्रकल्पाची कामे अद्यापही अपूर्ण असल्याने हिवरा, केगाव परिसरात बेंबळाचे पाणी पोचलेच नाही.यामुळे या परिसरातील शेतकरऱ्यात संताप व्यक्त केल्या जात आहे.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीप पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नदीकाठावरील शेतातील पिकाची तर तीनदा पेरणी करून पिके खरडून गेली. खरिपाची पिके गेल्याने रब्बी पिकाच्या माध्यमातून कशी तरी तडजोड करायची म्हणून रब्बीची लागवड केली, परंतु बेंबळा ने निराशा केली. या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. बेंबळाचे पाणी मिळेल या आशेने मार्डी विभागातील अनेक शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली परंतु मार्डी शिवारातील अनेक ठिकाणी कच्चे कॅनल बनवून ठेवलेल्या ठिकाणी आतापर्यंत पाणी पोहचलेच नाही. त्यामुळे हे कॅनल निकामी असल्याचे शेतकऱ्यांना भासू लागले आहे.
बेंबळा प्रकल्पाचा फायदा कुंभा, मार्डी विभागातील अनेक गावांना होणार आहेत. मात्र, बऱ्याच वर्षांपासून सुरू असलेले हे कॅनलचे काम संथगतीने सुरु आहे.
मारेगाव तालुक्यातील बेंबळा प्रकल्पाचे शेवटचे टोक असलेल्या हिवरा, केगाव कानडा, शिवणी, पार्डी या परिसरातील बेंबळा प्रकल्पाचे काम अद्यापही अपूर्णच असल्याची माहिती आहे. या भागातील शेतकऱ्यांना बेंबळाच्या पाण्याची प्रतीक्षा आहेत बेंबळाच्या या संथगतीच्या कामाविषयी शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात आहे.
बेबळाचे पाणी शेतापर्यंत येत नसल्याने शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. गावाच्या शिवेपर्यंत थेट कॅनल आले आहे परंतु काम अर्धवट असल्याने शेतकरऱ्यांना सिंचनाचा कोणताही फायदा होत नाही. या उलट याच तालुक्यात काही ठिकाणी दोन वर्षा पूर्वी झालेल्या कॅनल, पटसऱ्या पर्यंत पाणी पोहचले आहे. बेंबळा प्रकल्पाचे काम अर्धवट असून ते त्वरित पूर्ण करून शेतकऱ्यांना पाणी द्यावे. अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
माझे केंगाव चिंचमंडळ शिवारात शेत असून माझा शेतापासून बेंबळा चे 2008 ते 2009 ला कॅनलचे कच्चे काम झाले. त्या दरम्यान, आम्हा शेतकऱ्यांना 2014 पर्यंत तुम्हाला पाणी मिळेल असे आश्वासन दिले होते. परंतु दहा पंधरा वर्ष लोटूनही आम्हा शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. कॅनलचे पक्के काम लवकर होईल अशी अपेक्षा आहे.-निलेश भेदुरकर चिंचमंडळ
बेंबळा प्रकल्प ठरताहेत पांढरा हत्ती,पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांना बेंबळाच्या पाण्याची प्रतिक्षा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 07, 2023
Rating: