अभिनेता रत्नकांत यांची अष्टदेशी भेट

सह्याद्री चौफेर | प्रदीप गावंडे 

पनवेल : भारतीय संस्कृती, योग व निसर्गपचार या अनुशंगाने 11 एप्रिल ते 22 एप्रिल बारा दिवस पनवेलचे अभिनेता रत्नकांत म्हात्रे युरोपमधील आठ देश म्हणजे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, लिकटेनस्टाईन, ऑस्ट्रिया, आणि इटली येथे भेट देणार आहेत.

प्रत्येक देशातील मराठी मंडळ तसेच काही आरोग्य संस्था व त्यांच्या सभासदांची रत्नकांत भेट घेऊन आपली भारतीय संस्कृती तिचे महत्त्व व जतन याविषयी तसेच आरोग्यविषयक योग व निसर्गोपचार प्रचार आणि प्रसार विषयी चर्चा करून मार्गदर्शन करतील. आपल्या तेथील वास्तव्यात आपल्या आगामी गुजराती "चौथो वानरो" व हिंदी "मिस्टर टोकियोकर" या चित्रपटांचे प्रमोशन करतील. योगायोगाने आपल्या वाढदिवशी ते स्वित्झर्लंडला आहेत.

त्यामुळे 16 एप्रिल हा वाढदिवस ते स्वित्झर्लंडला साजरा करणार आहेत अशी अभिनेता रत्नकांत यांची अष्टदेशी भेट पूर्ण होणार आहे. त्यांना व त्यांच्या चित्रपटांना आपणा सर्वांकडून शुभेच्छा .

कोल डेपोत सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आयपीएल सट्टा अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये दोघांना अटक करीत एक लाख 67 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 7 एप्रिलला आरके कोल डेपो वणी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

अफसर खान अनवर खान पठाण (36) रा. शास्त्रीनगर वणी, रिझवान सैयद रियाज सैयद (22) रा. मोमीनपुरा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 7 एप्रिलला गस्तीवर होते. यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अफसर खान अनवर खान पठाण त्याच्या मालकीच्या आरके कोल डेपो वणी येथील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आयपीएल टी-20 क्रिकेट सामन्यात 7 एप्रिलच्या हैद्रराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट या मॅचवर मोबाईल फोन व लॅपटॉपच्या साहाय्याने लोकांकडून पैसे घेऊन पैशांची बाजी लावत हारजीतचा जगार खेळवित आहे. या माहितीवरून पथकाने तत्काळ पंचासह घटनास्थळी छापा कारवाई केली. तेव्हा क्रिकेट सट्टा घेणाऱ्या संबंधित दोघांना मोक्यावर ताब्यात घेण्यात आले. यावेळी घटनास्थळावर मोबाईल, लॅपटॉप असे क्रिकेट सट्ट्याचे साहित्य अंदाजे एक लाख 50 हजार 150 रुपये तसेच आरोपींच्या अंगझडतीमध्ये मिळालेले 17 हजार 500 रुपये असा एकूण 1 लाख 67 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीविरुद्ध वणी पोलिसांत यशस्वी केली.

महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी दिला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, साहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रजनीकांत मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ तसेच पोलिस निरीक्षक सायबर सेल व त्यांच्या टिमनेयशस्वी केली.


मारेगाव : पुन्हा कोंबड बाजाराने डोकेवर काढले..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात मटका, जुगार, रेती तस्करी, दारूविक्री चे अवैध धंदे शमलेले नसताना आता कोंबड्याच्या बाजाराने पुन्हा डोकं वर काढले आहे. 

मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वेगाव येथे मात्र, अवैध धंद्यांना ऊत आल्याचे दिसून येत असून गावपरिसराचे वातावरण बिघडण्याच्या मागावर आहे. गेल्या काही दिवसापासून येथे दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय बिनबोबाट जोमात आहे.
याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

खरीप हंगामातील पिक पाण्याचा पैसा हाती आला की, जुगार,कोंबड बाजार सर्रास भरविले जातात. यात घामाचा चिक्कार पैसे उडवले जात असून लाखों रुपयांच्या वर या खेळात उलाढाल असल्यामुळे "उपर से लेके नीचे तक" संबंधितांचे हात येथे ओले होत असल्याचे बोलल्या जाते. वेगांव येथील शासकीय इमारती च्या मागील भागात रविवार, शुक्रवार व मंगळवार ला कोंबड्याची झुंजी (बाजार) भरवून जुगार खेळवला जातो. या ठिकाणी वेगाव, वणी, मारेगाव, चंद्रपूर, राळेगाव, वर्धा चे कोंबड शौकीन या बाजाराचे नियोजन करून सुशिक्षीत तरूणांना हाताला धरतात. त्यामुळे तरुणांई यात गुंतून व्यसनाधीन होण्याच्या मागावर आहे. यातून एखादी विपरीत घडण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे बेकायदेशीर अवैध धंद्याने समाजिक सलोखा धोक्यात आला आहे. तशी चिंताही व्यक्त होत असून तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून होत आहे. परिणामी मारेगाव पोलिस प्रशासनाकडून या अवैध धंद्याना पूर्णविराम देणार का? याकडे जनतेच्या नजरा खिळल्या आहेत.

राज्यातील 30 जिल्ह्यांना गारपिटीसह वादळी पावसाचा इशारा; यलो अलर्ट जारी..

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात काल दिवसभर विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. झालेल्या वादळी पावसाने हवामान दमट झाल्याने उष्णता भयानक वाढल्याचे आढळून आले. दरम्यान राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असताना पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

आज (दि.08) शनिवारी राज्यातील वादळी पाऊस, गारपिटीचा इशाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

 तर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 37.2 (19.9), जळगाव 39 (20.3), धुळे 37.5 (18.2), कोल्हापूर 38.1 (24.2), महाबळेश्‍वर 31.1 (16), नाशिक 37.3 (20.7), निफाड 37.2 (14.1), सांगली 39 (24.9), सातारा 37.5 (21.4), सोलापूर 40.2 (24.1), रत्नागिरी 33 (23.4), छत्रपती संभाजीनगर 36 (22), नांदेड 38.8 (23.2), परभणी 39.4 (25), अकोला 40 (25.8), अमरावती 38.6 (24), बुलडाणा 36.5 (23.2), ब्रह्मपुरी 40 (22.4),गडचिरोली 34 (20), गोंदिया 38 (21.8), नागपूर 37.4 (21.9), वर्धा 39.8(24), वाशीम 39.6 (20.2) यवतमाळ 39 (24.5) तापमानाची नोंद झाली.


आजचे राशीभविष्य: ८ एप्रिल शनिवार..!

               आजचे राशीभविष्य: ८ एप्रिल शनिवार..!

मेष (Aries):
सामाजिक व राजकीय आघाडीवर आपली विशेष प्रतिमा निर्माण होऊ शकते. आपल्या कार्याची योग्य दखल घेतली जाईल. त्याचे कौतुक होईल. महत्त्वाची कामे करताना त्यात पुरेसे लक्ष घालून ती स्वतःच्या निगराणीखालीच पूर्णत्वास न्यावी. छुपे शत्रू कोणत्या क्षणी दगा देतील, याचा नेम नाही. आर्थिक आघाडीवर काही अडचणी सुरू असतील तर त्या सावकाश दूर होऊ लागतील. काही जुनी येणी मिळू शकतील. आपली आर्थिक घडी सुस्थितीत येऊ लागेल. कुटुंबात समाधान असेल.
 
वृषभ (Taurus):
आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी सध्याची ग्रहस्थिती फारशी चांगली नाही. अतिशय व्यग्रता, काही महत्त्वाच्या निर्णयाच्या प्रसंगी दोलायमान स्थिती, एखाद्याच्या सांगण्यावरून विचार न करता भूमिका ठरवणे वगैरे घडू शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली तर भरपूर विचार करावा. प्रसंगी ज्येष्ठांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. करायला जावे एक आणि व्हावे विपरीत असा अनुभव येतच असेल. कार्यक्षेत्रात संमिश्र वातावरण राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद टाळा.
 
मिथुन (Gemini):
महत्त्वाची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला जीवाचे रान करावे लागेल, याची तयारी ठेवा. सामाजिक व राजकीय आघाडीवर काम करताना प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही याची खबरदारी घ्या. आर्थिक आघाडीवर धीम्या गतीने का होईना, पण सुधाराचे योग आहेत. काहींना वाहन-स्थावर खरेदीचे योग संभवतात. नोकरी व व्यवसायात नरम-गरम वातावरण राहील. सहकार्‍यांशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. हाडांची दुखणी असणार्‍यांचा त्रास वाढू शकतो. कुटुंबात सहकार्याचे वातावरण राहील.
 
कर्क (Cancer):
महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येणे, काम पूर्णत्वास न जाणे किंवा ऐनवेळेवर काम फिसकटून पदरी अपयश पडणे असे सध्या घडत असावे. त्यामुळे काही व्यावहारिक व धोरणात्मक भूमिका अंगीकारणे लाभदायक ठरेल. आर्थिक आघाडीवर स्वस्थता राहील. आवक मंदावलेली असेल. पण त्यामुळे फारसे काही बिघडणार नाही. स्थावर संपत्ती खरेदी-विक्रीची योजना असेल. काही मंडळी वाहन खरेदीच्या प्रयत्नातदेखील असू शकतात. आर्थिक व्यवहार करताना पुरेशी काळजी घ्या.

सिंह (Leo):
नोकरी-व्यवसायात दगदग व धावपळ वाढेल. गुप्त शत्रूंच्या कारवाया आपल्या मार्गात अडचणी निर्माण करू शकतात. प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करावी लागेल. आर्थिक अंदाजपत्रक बिघडू शकते. आवक अडलेली वा मंदावलेली राहील आणि खर्च मात्र वाढलेला असेल. काही आकस्मिक खर्चदेखील मनस्ताप देतील. जमीन वा वाहन खरेदीच्या योजना असल्यास व्यवहार पूर्ण सावधगिरीने करावा. कोणी सांगितले म्हणून विसंबून राहू नये. प्रकृतीकडे दुर्लक्ष होण्याची संभावना आहे.
 
कन्या (Virgo):
हा आठवडा प्रामुख्याने सकारात्मक आणि हाती घेतलेल्या कार्यात यश देणारा ठरावा. नोकरी- व्यवसायासाठी अतिशय उत्तम असणार आहे. निश्चित योजना आखून व्यावसायिक पावले उचलली तर भरपूर फायदा पदरी पडू शकेल; पण एक पथ्य पाळावयास हवे. कोणतेही कार्य हे दुसर्‍या कुणाच्या दबावाखाली येऊन वा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून हाती घेऊ नये. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. आपल्या कामात सर्वांची साथ मिळेल.
 
तूळ (Libra): 
 या आठवड्यात काही अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. विशेषतः नोकरीत असणार्‍यांना चांगले इन्सेंटिव्ह, वाढ मिळण्याची शक्यता आहे, तर व्यवसायात असाल तर नवे उपक्रम सुरू करता येतील. नव्या व्यवसायात किंवा नव्या क्षेत्रात पदार्पण करता येऊ शकेल. आर्थिक घडी अधिक मजबूत होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होऊ शकतील. जुने विकून नवीन खरेदीचे योग संभवतात. आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. काहींना वैवाहिक जीवनात काहीसा तणाव जाणवू शकतो..
 
वृश्चिक (Scorpio):
हा आठवडा आपणास काहीसा संघर्षमय जाण्याची शक्यता आहे. लहानशा कामासाठीही बराच प्रयत्न करावा लागू शकतो. कामेही विलंबाने पूर्णत्वास जातील. या आठवड्यात खरे तर आपणास स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्यासंबंधातही काळजी घ्यावी लागेल. विशेषतः पोटाचे त्रास, कमरेचे त्रास, स्पॉन्डिलायटिसचा त्रास असणार्‍यांनी काळजी घेणे जरूरी आहे. आपली दिनचर्या सुधारून ही काळजी घेता येऊ शकेल. आर्थिक आघाडीवर सतर्क राहावे. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

धनु (Sagittarius):
कोणतेही मोठे निर्णय घेताना आपणास या आठवड्यात पुरेपूर सावधगिरी बाळगायला हवी. आर्थिक फसवणूक, दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतील, त्यांना बळी पडू नका. कोणावरही, विशेषतः आर्थिक व्यवहारात विसंबून राहणे, विश्वास टाकणे धोक्याचे राहील. व्यवसायात जपून पावले उचलावीत. नवे उपक्रम हाती घेणार असाल तर थोडे थांवा. परिस्थितीचा अदमास घेऊन धोरण ठरवावे. कुटुंबात काहीसे संमिश्र वातावरण राहील. आरोग्याबाबत काही किरकोळ त्रास सतावतील.
  
मकर (Capricorn)
कार्यालयीन कामात दगदग आणि एवढे करूनही हाती काही न लागण्याची स्थिती आता बदलणार आहे. धीम्या गतीने का होईना, पावले सकारात्मकतेच्या दिशेने पडणार आहेत. हा आठवडा काहीसा अधिक खर्च करायला लावू शकतो; मात्र तो आपणास त्याचा आनंदही देईल. खर्च व्यर्थ जाणार नाही. वाहन किंवा स्थावरसंबंधी व्यवहार होऊ शकतात. काहींना मंडळींना एखादी नवीन दिशा व्यावसायिक पदार्पणासाठी खुणावू लागेल. त्यांचा वेळीच लाभ घेणे इष्ट राहील.
 
कुंभ (Aquarius) :
 या आठवड्यात जवळपास प्रत्येकच कामात आपणास बरीच मेहनत घ्यावी लागेल. विशेषतः सरकारी कामात कमालीचा विलंब लागू शकतो. परंतु धीर न सोडता प्रयत्न सुरू ठेवल्यास अंतिमतः यश आपल्याच पदरी पडणार आहे. काहींना आरोग्यासंबंधी कुरबुरी जाणवतील. पथ्यपाणी सांभाळून प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. खर्चाला अनेक वाटा उपलब्ध होऊ शकतात. मात्र, हा खर्च काही विधायक कामात होऊन त्याचे समाधान मिळू शकेल. कुटुंबात समाधान राहील.
 
मीन (Pisces) :
weekly Horoscope : हा आठवडा आपणा, बव्हंशी उत्तम जाणार आहे. अनेक सकारात्मक गोष्टी घडू शकतील. आपली अडलेली कामे पूर्णत्वास जातील. आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. अडलेला पैसा मिळेल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. अचानक काही मोठे व्यवहार व त्यातून अपेक्षित लाभ संभवतो. आपल्या सहकार्‍यांशी संबंध सौहार्द्राचे राहतील याची काळजी घ्या. कौटुंबिक जीवनात चांगले वातावरण राहील. काही किरकोळ प्रसंग वगळता कुटुंबातील सदस्यांची उत्तम साथ मिळेल.