कोल डेपोत सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

वणी : आयपीएल सट्टा अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये दोघांना अटक करीत एक लाख 67 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 7 एप्रिलला आरके कोल डेपो वणी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

अफसर खान अनवर खान पठाण (36) रा. शास्त्रीनगर वणी, रिझवान सैयद रियाज सैयद (22) रा. मोमीनपुरा यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक 7 एप्रिलला गस्तीवर होते. यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, अफसर खान अनवर खान पठाण त्याच्या मालकीच्या आरके कोल डेपो वणी येथील कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आयपीएल टी-20 क्रिकेट सामन्यात 7 एप्रिलच्या हैद्रराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायन्ट या मॅचवर मोबाईल फोन व लॅपटॉपच्या साहाय्याने लोकांकडून पैसे घेऊन पैशांची बाजी लावत हारजीतचा जगार खेळवित आहे. या माहितीवरून पथकाने तत्काळ पंचासह घटनास्थळी छापा कारवाई केली. तेव्हा क्रिकेट सट्टा घेणाऱ्या संबंधित दोघांना मोक्यावर ताब्यात घेण्यात आले. यावेळी घटनास्थळावर मोबाईल, लॅपटॉप असे क्रिकेट सट्ट्याचे साहित्य अंदाजे एक लाख 50 हजार 150 रुपये तसेच आरोपींच्या अंगझडतीमध्ये मिळालेले 17 हजार 500 रुपये असा एकूण 1 लाख 67 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपीविरुद्ध वणी पोलिसांत यशस्वी केली.

महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी दिला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, साहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक योगेश रंधे, योगेश डगवार, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, रजनीकांत मडावी सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ तसेच पोलिस निरीक्षक सायबर सेल व त्यांच्या टिमनेयशस्वी केली.


कोल डेपोत सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा कोल डेपोत सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलिसांचा छापा Reviewed by सह्याद्री चौफेर on April 09, 2023 Rating: 5
Powered by Blogger.