सह्याद्री चौफेर | प्रदीप गावंडे
पनवेल : भारतीय संस्कृती, योग व निसर्गपचार या अनुशंगाने 11 एप्रिल ते 22 एप्रिल बारा दिवस पनवेलचे अभिनेता रत्नकांत म्हात्रे युरोपमधील आठ देश म्हणजे फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, लिकटेनस्टाईन, ऑस्ट्रिया, आणि इटली येथे भेट देणार आहेत.
प्रत्येक देशातील मराठी मंडळ तसेच काही आरोग्य संस्था व त्यांच्या सभासदांची रत्नकांत भेट घेऊन आपली भारतीय संस्कृती तिचे महत्त्व व जतन याविषयी तसेच आरोग्यविषयक योग व निसर्गोपचार प्रचार आणि प्रसार विषयी चर्चा करून मार्गदर्शन करतील. आपल्या तेथील वास्तव्यात आपल्या आगामी गुजराती "चौथो वानरो" व हिंदी "मिस्टर टोकियोकर" या चित्रपटांचे प्रमोशन करतील. योगायोगाने आपल्या वाढदिवशी ते स्वित्झर्लंडला आहेत.
त्यामुळे 16 एप्रिल हा वाढदिवस ते स्वित्झर्लंडला साजरा करणार आहेत अशी अभिनेता रत्नकांत यांची अष्टदेशी भेट पूर्ण होणार आहे. त्यांना व त्यांच्या चित्रपटांना आपणा सर्वांकडून शुभेच्छा .
अभिनेता रत्नकांत यांची अष्टदेशी भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 09, 2023
Rating:
