मारेगाव : पुन्हा कोंबड बाजाराने डोकेवर काढले..!

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यात मटका, जुगार, रेती तस्करी, दारूविक्री चे अवैध धंदे शमलेले नसताना आता कोंबड्याच्या बाजाराने पुन्हा डोकं वर काढले आहे. 

मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वेगाव येथे मात्र, अवैध धंद्यांना ऊत आल्याचे दिसून येत असून गावपरिसराचे वातावरण बिघडण्याच्या मागावर आहे. गेल्या काही दिवसापासून येथे दारू विक्री, जुगार व कोंबड बाजार आदी अवैध व्यवसाय बिनबोबाट जोमात आहे.
याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.

खरीप हंगामातील पिक पाण्याचा पैसा हाती आला की, जुगार,कोंबड बाजार सर्रास भरविले जातात. यात घामाचा चिक्कार पैसे उडवले जात असून लाखों रुपयांच्या वर या खेळात उलाढाल असल्यामुळे "उपर से लेके नीचे तक" संबंधितांचे हात येथे ओले होत असल्याचे बोलल्या जाते. वेगांव येथील शासकीय इमारती च्या मागील भागात रविवार, शुक्रवार व मंगळवार ला कोंबड्याची झुंजी (बाजार) भरवून जुगार खेळवला जातो. या ठिकाणी वेगाव, वणी, मारेगाव, चंद्रपूर, राळेगाव, वर्धा चे कोंबड शौकीन या बाजाराचे नियोजन करून सुशिक्षीत तरूणांना हाताला धरतात. त्यामुळे तरुणांई यात गुंतून व्यसनाधीन होण्याच्या मागावर आहे. यातून एखादी विपरीत घडण्याचे शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे बेकायदेशीर अवैध धंद्याने समाजिक सलोखा धोक्यात आला आहे. तशी चिंताही व्यक्त होत असून तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून होत आहे. परिणामी मारेगाव पोलिस प्रशासनाकडून या अवैध धंद्याना पूर्णविराम देणार का? याकडे जनतेच्या नजरा खिळल्या आहेत.
मारेगाव : पुन्हा कोंबड बाजाराने डोकेवर काढले..! मारेगाव : पुन्हा कोंबड बाजाराने डोकेवर काढले..! Reviewed by सह्याद्री चौफेर on April 08, 2023 Rating: 5
Powered by Blogger.