वऱ्हाडी खाद्यसंस्कृती महोत्सव पुणे-मुंबईत भरविणार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

अमरावती : महोत्सवात महिलाभगिनींनी स्टॉलद्वारे विविध वस्तू, पदार्थ उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई व पुणे येथेही वऱ्हाडी खाद्यसंस्कृती महोत्सव भरवून तिथे येथील बचत गटांना संधी उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावतीत बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी मॉल निर्माण व्हावा व फिरत्या पद्धतीने गटांना तो उपलब्ध करून द्यावा. राज्य शासन त्यासाठी निश्चित सहकार्य करेल, अशीही सूचना त्यांनी केली.

          विषमुक्त शेतीला चालना मिळण्याच्या दृष्टीने प्राकृतिक शेतीबाबत विविध कक्षांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास मदतीचे प्रमाण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी वाढवून दिले आहे. त्याचा लाभ आपत्तीत सापडलेल्या शेतकरी बांधवांना होत आहे, असे खासदार डॉ. बोंडे यांनी सांगितले. आमदार श्री. अडसड यांचेही भाषण झाले. श्री. मुळे यांनी प्रास्ताविक केले. श्री. खर्चान यांनी आभार मानले. क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केले.

विविध स्टॉलची पाहणी

 उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महोत्सवात सहभागी विविध स्टॉलची पाहणी करून तेथील महिलाभगिनी, शेतकरी, युवकांशी संवाद साधला. त्यांच्याकडील उत्पादनांची माहिती जाणून घेत त्यांना प्रोत्साहन दिले

शौचालयाची इमारत मागील तीन वर्षांपासून धुळखात

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : लाखो रुपये खर्च करून मच्छिन्द्रा येथे  सार्वजनिक शौचालय बांधले. परंतु ही शौचालयाची इमारत मागील तीन वर्षांपासून अपूर्ण असून, "खडे खडे जनतेला वाकुल्या" दाखवत आहे. बांधलेली ही शौचालय इमारत कामच करत नाहीत. याकडे सरपंच सचिव तसेच विद्यमान पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ग्रामस्थांना याची सेवा मिळणार कधी. असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागातील लोकांचे सामान्य जीवनमान सुधारणे,
ग्रामीण भागात स्वच्छता कव्हरेजची गती वाढवणे आणि सर्व ग्रामपंचायतींना स्वच्छ स्तरावर आणणे, जागरूकता निर्माण आणि आरोग्य शिक्षणाद्वारे शाश्वत स्वच्छतेचा प्रचार करून समुदाय आणि पंचायती राज संस्थांना प्रेरित करणे. हा उद्देश समोर ठेवून मच्छिन्द्रा येथे मोकळ्या जागेवर शौचालयाची निर्मिती करण्यात आली. पण येथील शौचालयाची इमारत ही मागील तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे या उभ्या इमारतीची दशा आणि दिशा तपासने गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन कुठं कमी पडतेय हे आता संशोधनाचा विषय बनला आहे. 

दोन वर्षे लोटली,त्यामुळे आणखी किती काळ या शौचालयाची प्रतीक्षा करावी लागेल, ही इमारत नेमकी कशासाठी उभारण्यात आली, नागरिकांच्या फायद्यासाठी उभारली, की संबंधितानी आपलं फक्त हित जोपसलं का? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे.

भर उन्हात पोरांनी लुटला घाणमाकडीचा आनंद

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : एकीकडे होळीच्या सणाला सगळीकडे रंगाची उधळण होत असते. तर दुसरीकडे होळीला असलेले महत्व आणि परंपरा घाणमाकड च्या रूपाने ग्रामीण भाग जोपासत आहे. सध्या जगासोबत देशही मोठी प्रगती करीत आहे. या प्रगतीसोबतच पारंपरिक असलेले अनेक खेळही लुप्त झालेले आहे. तर काही खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अशातच पारंपरिक असलेली ही घाणमाकड सुद्धा मारेगाव तालुक्यामध्ये क्वचितच नजरेस पडते. असाच तालुक्यामध्ये आमचा प्रतिनिधी फेरफटका मारत असता, तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे ही घाणमाकड नजरेस पडली.
 

पूर्वी मोठ्या पासून तर लहाण्यापर्यंत मुले या घाणमाकडेसोबत अति उत्साहाने खेळताना दिसायची. पण आता लहान मुलं कशी बशी खेळतांना दिसतात. अँड्रॉइड युगामुळे शहरामधून अनेक खेळ लुप्त झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागामध्ये काही खेळ अजूनही जीवंत असल्याचे दृष्टीस पडताना दिसते. शहरी समाज आपली संस्कृती विसरत चालला तरी ग्रामीण भाग मात्र, अजूनही विज्ञानाच्या आणि विकासाच्या युगात आपले संस्कार आणि परंपरा जोपासत असल्याचे दिसत आहे. अशीच परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिन्द्रा येथील नवयुवक आणि लहान मुलें जपत आहे. दरवर्षी येणाऱ्या होळी सणाला चकल्या बनवून आणि घाणमाकड उभारून आपली परंपरा चालवत आहे. उद्या होलिका सण परवा धुडवळ जिला आपल्या भाषेत धुड्डी आणि आताची रंगपंचमी म्हणतात. तीच धुड्डी लहान मोठ्यांसह विविध रंग उधळून खेळले जातात...
    

विवेकानंद विद्यालयात व्यावसायिक शिक्षण कार्यशाळा संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी: शहरातील प्रसिद्ध विवेकानंद विद्यालय वणी येथे व्यावसायिक तथा समाजसेवक सागर मुने यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणावर कार्यशाळा घेतली. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेत अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करणे, आत्मविश्वासू असणे गरजेचे आहे.

मेहनत, प्रामाणिकपणा, नियोजन, तत्व, देणे घेणे, लोकांसोबत प्रेमाने बोलणे, प्रत्येक व्यवसाय हा उभा करायला भांडवल लागत नाही, तर इच्छा शक्ती असेल तर आपण मोठा कारखाना, कंपनी उभारू शकतो असे कार्यशाळेत सांगितले.
शिक्षण घेत असताना प्रथम श्रेणीत असले पाहिजे, एका पदवी वर अवलंबून न राहता चार पदवी असली पाहिजे, एका व्यवसायसोबत त्याला पूरक पुन्हा चार व्यवसाय ही काळाची गरज आहे. घेतलेले ज्ञान, शिक्षण हे कधीच वाया जात नाही, सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगावा याबाबत विविध उदाहरणे देऊन त्यांनी तो विद्यार्थ्यांना पटवून दिला.

विद्यार्थ्यांनी आपले ध्येय विद्यार्थी दशेतच निश्चित केले पाहिजे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी वरिष्ठ शिक्षक गेडाम हे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गोंडे, आभार प्रितेश लखमापुरे यांनी केले. प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

ऑनलाईन क्रिकेट सट्टा घेणाऱ्या दोघांना अटक,1 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शहरातील रंगारीपुरा येथे छुप्या पद्धतीने सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा अड्यावर धाड टाकून क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघा जणांना रंगेहाथ अटक केली. ही कार्यवाही 3 मार्चला रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास गुन्हे शोध पथकाने केली.

राजेश्वर सुरेश चापडे (34) रा. रंगनाथ नगर व शिवा भारतभूषण शर्मा (29) रा. रंगारीपुरा असे या अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वणी शहरातील रंगारीपुरा परिसरात क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळवला जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे डिबी पथकाने रंगारीपुरा परिसरातील एका बंद खोलीमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन (online) क्रिकेट सट्यावर धाड टाकली.यात सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोन सट्टेबाजांना पोलिसांनी घटनास्थळावरून रंगेहाथ ताब्यात घेतले. दरम्यान,क्रिकेट बेटिंग करिता वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. यात 4 मोबाईल, एलईडी टिव्ही, लॅपटॉप असा एकूण 1 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट सामन्यांची मालिका सुरु असून, कराची विरुद्ध इस्लामाबाद संघादरम्यान सुरु असलेल्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळविला जात होता. याची माहिती डिबी पथकाला मिळाल्याने त्यांनी रंगारीपुरा परिसरातील एका खोलित सुरु असलेल्या अड्यावर धाड टाकून दोघांनाही क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन सट्टा घेतांना रंगेहाथ अटक केली.

सदरची कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप, एसडीपीओ संजय पुज्जलवार, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप शिरस्कर, डीबी पथकाचे सपोनि आशिष झिमटे, डिबी पथकाचे सुदर्शन वानोळे, डोमाजी भादीकर, सुहास मंदावार, हरिन्द्रकुमार भारती, सागर सिडाम, शुभम सोनुले, पुरुषोत्तम डडमल, छाया उमरे यांनी केली.