सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : लाखो रुपये खर्च करून मच्छिन्द्रा येथे सार्वजनिक शौचालय बांधले. परंतु ही शौचालयाची इमारत मागील तीन वर्षांपासून अपूर्ण असून, "खडे खडे जनतेला वाकुल्या" दाखवत आहे. बांधलेली ही शौचालय इमारत कामच करत नाहीत. याकडे सरपंच सचिव तसेच विद्यमान पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ग्रामस्थांना याची सेवा मिळणार कधी. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ग्रामीण भागातील लोकांचे सामान्य जीवनमान सुधारणे,
ग्रामीण भागात स्वच्छता कव्हरेजची गती वाढवणे आणि सर्व ग्रामपंचायतींना स्वच्छ स्तरावर आणणे, जागरूकता निर्माण आणि आरोग्य शिक्षणाद्वारे शाश्वत स्वच्छतेचा प्रचार करून समुदाय आणि पंचायती राज संस्थांना प्रेरित करणे. हा उद्देश समोर ठेवून मच्छिन्द्रा येथे मोकळ्या जागेवर शौचालयाची निर्मिती करण्यात आली. पण येथील शौचालयाची इमारत ही मागील तीन वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे या उभ्या इमारतीची दशा आणि दिशा तपासने गरजेचे आहे. स्थानिक प्रशासन कुठं कमी पडतेय हे आता संशोधनाचा विषय बनला आहे.
दोन वर्षे लोटली,त्यामुळे आणखी किती काळ या शौचालयाची प्रतीक्षा करावी लागेल, ही इमारत नेमकी कशासाठी उभारण्यात आली, नागरिकांच्या फायद्यासाठी उभारली, की संबंधितानी आपलं फक्त हित जोपसलं का? असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे.
शौचालयाची इमारत मागील तीन वर्षांपासून धुळखात
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 05, 2023
Rating:
