भर उन्हात पोरांनी लुटला घाणमाकडीचा आनंद

सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे 

मारेगाव : एकीकडे होळीच्या सणाला सगळीकडे रंगाची उधळण होत असते. तर दुसरीकडे होळीला असलेले महत्व आणि परंपरा घाणमाकड च्या रूपाने ग्रामीण भाग जोपासत आहे. सध्या जगासोबत देशही मोठी प्रगती करीत आहे. या प्रगतीसोबतच पारंपरिक असलेले अनेक खेळही लुप्त झालेले आहे. तर काही खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अशातच पारंपरिक असलेली ही घाणमाकड सुद्धा मारेगाव तालुक्यामध्ये क्वचितच नजरेस पडते. असाच तालुक्यामध्ये आमचा प्रतिनिधी फेरफटका मारत असता, तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे ही घाणमाकड नजरेस पडली.
 

पूर्वी मोठ्या पासून तर लहाण्यापर्यंत मुले या घाणमाकडेसोबत अति उत्साहाने खेळताना दिसायची. पण आता लहान मुलं कशी बशी खेळतांना दिसतात. अँड्रॉइड युगामुळे शहरामधून अनेक खेळ लुप्त झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागामध्ये काही खेळ अजूनही जीवंत असल्याचे दृष्टीस पडताना दिसते. शहरी समाज आपली संस्कृती विसरत चालला तरी ग्रामीण भाग मात्र, अजूनही विज्ञानाच्या आणि विकासाच्या युगात आपले संस्कार आणि परंपरा जोपासत असल्याचे दिसत आहे. अशीच परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून मच्छिन्द्रा येथील नवयुवक आणि लहान मुलें जपत आहे. दरवर्षी येणाऱ्या होळी सणाला चकल्या बनवून आणि घाणमाकड उभारून आपली परंपरा चालवत आहे. उद्या होलिका सण परवा धुडवळ जिला आपल्या भाषेत धुड्डी आणि आताची रंगपंचमी म्हणतात. तीच धुड्डी लहान मोठ्यांसह विविध रंग उधळून खेळले जातात...
    
भर उन्हात पोरांनी लुटला घाणमाकडीचा आनंद भर उन्हात पोरांनी लुटला घाणमाकडीचा आनंद Reviewed by सह्याद्री चौफेर on March 05, 2023 Rating: 5
Powered by Blogger.