ठाणेदार जाधव यांचेकडुन धावण्याचे जोडे वाटप

सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : परिश्रम वाचनालय मुकूटबन येथे शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजता पोलीस भरतीसाठी मैदानी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुकूटबन पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजीत जाधव यांच्या कडुन शारीरीक चाचणीसाठी धावण्यासाठी लागणारे धावण्याचे जोडे (रनिंग शू) चे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी सहयोग ग्रुपचे सदस्य व शाळेचे मुख्याध्यापक सुरेन्द्र गेडाम, प्रा. गजानन गद्दलवार, डॉ. नेताजी पारशिवे, अध्यापक विलास चिट्टलवार उपस्थीत होते. ठाणेदार जाधव विद्यार्थीना मैदानी शारीरीक चाचणी बद्दल माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चिट्टलवार यांनी केले. या प्रंसगी पोलीस भरतीसाठी मैदानी तयारी करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

झरी जामणी तालुक्यात युवक काँग्रेस आक्रमक-राज्य सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी

झरी जामणी : तालुका युवक काँग्रेस पार्टी व शेतकरी व कष्टकरी मजूर वर्ग यांच्यावतीने शासनाच्या विरोधात २ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध करणार आहे. तहसीलदार झरी जामणी यांचे मार्फत जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका समन्वय एग्रीकल्चर इंश्योरेंस कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड (एआयसी), पाटण पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना मंगळवारी (२७ डिसेंबर) निवेदन देण्यात आले.
पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेती मालाचा पीक विमा काढला. विमा कंपनीने अक्षरशा शेतकऱ्यांची लूट सुरू असून कुठल्याही प्रकारचे नैसर्गिक विम्याच्या लाभ दिला नाही. महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टीची मदत दिली याचा अर्थ नुकसान झाले. परंतु विमा कंपनीने शेतकऱ्यांना कसलीही मदत केली नाही. तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना १०० टक्के विमा मिळावा, शिवछत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेंतर्गत वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, महात्मा फुले प्रोत्साहन निधी त्वरित देण्यात यावी. अतिवृष्टीचे १००% टक्के निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, हेक्टरी १३ हजार ६०० रुपये शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी यासाठी शासनाच्या विरोधात २ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण व धरणे आंदोलन करून शासनाचा निषेध करणार आहे. 
अनेक वेळा उपोषण व धरणे आंदोलन

महाराष्ट्र शासनाला जागे करण्यासाठी युवक काँग्रेस ने अनेक वेळा उपोषण व धरणे आंदोलन केले असून मुकुटबन येथे पाटण मुकुटबन मार्गावर तुरीचे चुकारे साठी टायर पेटऊन चक्का जाम आंदोलन, तहसील कार्यालय समोर आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या विरोधात बेरोजगार युवकांना कामावर घेण्यासाठी उपोषण, हमालीचे पैसे तत्काळ देण्यात यावे व चना चुकाऱ्यासाठी तीन दिवस आमरण उपोषण, रुईकोट ते पाटणबोरी रस्त्यासाठी आंदोलन, बेरोजगार युवकांसाठी भजे तळा आंदोलन, पाटण ते झरी रस्त्यासाठी आंदोलन, चाळीस गावात आरोग्य शिबिर घेऊन चष्मे वाटप करून शस्त्रक्रिया करून घेतल्या, जनतेच्या समस्या निवेदनच्या माध्यमातून सोडल्या, निराधार लोकांना सतत मदत करणे. अशा प्रकारची अनेक आंदोलने, उपोषण व समाजसेवेची कामे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप बुर्रेवार, दिग्रसचे सरपंच व तालुका सरपंच संघटनाचे अध्यक्ष नीलेश येल्टीवार, युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल धांडेकर यांंचे नेतृत्वात हरिदास गुर्जलवार, संतोष जंगीलवार, सचिन टाले, गंगाधर आत्राम, रमेश संकसनवार, प्रतिक गंड्रतवार, राकेश गालेवार, चेतन मॅकलवार, नितिन खडसे, श्रीकांत आनुकुमवार, शंकर आकुलवार यांचे तर्फे केल्या गेले हे उल्लेखनीय आहे.


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व कोरेगाव भीमा शौर्य दिन


भिमा कोरेगाव शौर्यदिन-नूतन वर्ष व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त तमाम मारेगाव तालुक्यातील जनतेस हार्दिक शुभेच्छा...!
          
कोरेगाव भीमा येथे लढलेल्या युद्धात शौर्य गाजविणाऱ्या व हौतात्म्य पत्करलेल्या सर्व शूर वीरांना विनम्र अभिवादन
तळागाळातील जनतेच्या अस्मितेचा हुंकार असणारा हा आजचा विजयदिन. कोरेगाव भीमा येथील रणसंग्रामाचा आठवण करुन देणारा हा दिवस.यानिमित्ताने सर्वांनाच हार्दिक शुभेच्छा व अनामिक विरांना विनम्र अभिवादन. 

"कोरेगाव -भीमा विजय दिन"

हे 2023 नविन वर्ष आपणास आनंदाचे, सुख, शांतीचे आरोग्याचे जावो...

शुभेच्छासह
    तालुका अध्यक्ष :-  गौतम दारुंडे 
   तालुका उपाध्यक्ष :- संजय जीवने
(वंचित बहुजन आघाडी शाखा, मारेगाव)

2023 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!


....2023 || नवंवर्षाभिनंदन...


दि.31 डिसेंबर रोजी 2022 वर्ष संपत आहे आणि नवीन वर्ष 2023 नवीन जीवनाचा अनुभव, 
आनंद आणि भरपूर प्रेम घेऊन येत आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की, 
नवीन वर्षाच्या वेळी आपण नवीन नियम बनवू, 
स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना काहीतरी नवीन चांगले करण्याचे वचन देऊ 
आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन पाऊल टाकू.

प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीस भरपूर सकारात्मकता, चांगली ऊर्जा आणि चांगले उत्साह असते. 
मानव हा दिवस त्यांचे मित्र, कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवून नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साजरा करतात.

नवीन वर्षाच्या समस्त मच्छिन्द्रा, बामर्डा व फेफरवाडा ग्रामवासियांना हार्दिक शुभेच्छा...!

शुभेच्छुक :- महेश पांडुरंगजी मुसळे
सदस्य : गट ग्रामपंचायत मच्छिन्द्रा, पं स मारेगाव 

नवंवर्षाभिनंदन 2023 निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!


                      || नवंवर्षाभिनंदन - 2023 || 

भिमा कोरेगाव शौर्यदिन - नूतन वर्ष व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त तमाम जनतेस पाटील फॅमिली तर्फे हार्दिक खूप खूप शुभेच्छा...!

"नवं पान, नवं दिवस, नवी स्वप्न, नवी ध्येय, नव्या आशा नवी माणसं, नवी नाती, नवं यश नवा आनंद,कधी अपूर्ण, कधी संपूर्ण नवा हर्ष, नवे वर्ष..!
          
 शुभेच्छासह 
  डॉ प्रशांत पाटील, फॅमिली फिजिशियन तथा पोलीस पाटील मार्डी ता. मारेगाव जि यवतमाळ