चक्क गावातील विहीरीत पडला बिबट्या

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
9623494935

ब्रम्हपुरी : तालुक्यातील किटाळी (बोद्रा) गावातील एका विहिरित बिबट्या पडल्याची घटना आज दिनांक 4/11/2022 ला अंदाजे पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्तांत असे आहे की,ब्रम्हपुरी तालुक्यातील चारही बाजूने घनदाट अरण्याने व्याप्त असलेल्या किटाळी (बोद्रा) गावातील संतोष मेश्राम यांच्या घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. विहिरीमध्ये बिबट्याच्या डरकाळीचा आवाज विहिरीजवळ असलेल्या घरातील लोकांना ऐकू आला. कशाचा आवाज आहे म्हणुन विहिरीजवळ जावून बघतात तर, काय चक्क? विहिरीत बिबट्या पडलेला होता ही माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली. लगेचच घटनास्थळाकडे वनविभागाची चमूने धाव घेतली. दरम्यान, बघ्यांची एकच गर्दी जमली होती.

तसेच एक ते दोन तासानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात वनविभागाच्या चमूला यश आले. व बिबट्याला नेण्यात आले. 

राशीभविष्य ४ नोव्हेंबर शुक्रवार..!


     
     जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा जाईल 

🐏 मेष
धार्मिक आणि सामाजिक कार्याला हातभार लावाल. ज्यांचे कोर्ट-कचेरीच्या समस्या आहेत त्या मार्गी लागतील. परदेशात जाण्यासाठी अनुकूल दिवस. जोडीदाराशी तडजोड स्वीकारावी. व्यापारी उधारी करू नये.

🦬 वृषभ
व्यापारी वर्गासाठी अनुकूल दिवस. केवळ व्यवहार करताना कदाचित चिडचिड होण्याची शक्यता असल्यामुळे शांत रहावे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खोटी आश्वासने देवू नयेत. आजारी व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी. अभ्यासात बौद्धीक मदत मिळेल.
👩‍❤️‍👨 मिथुन
नोकरदारांनी स्वताची जबाबदारी दुसर्‍यांवर टाकू नये. खेळ, कला क्षेत्रात उत्तम संधी मिळेल. अविवाहितांचे विवाह जुळूनयेण्याचे योग आहेत. जोडीदारासाठी हौशीने खर्च कराल. अभ्यासाव्यतिरिक्त दुसर्‍या गोष्टीत मन रमेल.

🦀 कर्क
व्यापारी वर्गाने व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नये. सरकारी नोकरदारांची बदलीचे योग संभवतात. खाजगी नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी मिळेल. प्रिय व्यक्तींशी वाद घालू नये. गुंतवणूक करताना घाईत निर्णय घेऊ नये.
🦁 सिंह
उत्साहवर्धक दिवस. प्रिय व्यक्तींशी गाठभेट होण्याची शक्यता. परंतु, समोरच्या व्यक्तीच्या लहरीपणाचा अनुभव येऊ शकतो. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. अभ्यासाला गुरूजनांची मदत मिळेल. हाताला दुखपत होण्याची शक्यता आहे.

👧🏻 कन्या
भागीदारीत किंवा महत्वाच्या गोष्टींसाठी करारपत्र करण्यास अनुकूल दिवस. धार्मिक गोष्टींत सहभाग घ्याल. कौटुंबिक गोष्टीत काही घटना मनाविरूद्ध होण्याची शक्यता आहे. काहींना विनाकारण मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता आहे.
⚖️ तुळ
ज्यांचे परदेशात जाण्याचे ठरत आहे त्यांनी जास्त प्रयत्न करावे. खेळ, कमिशन, कला, जाहीरात क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात जोडीदाराशी वाद घालू नये. व्यापारी वर्गासाठी मध्यम दिवस. जुगार, सट्टावर पैसे खर्च करू नये.

🦂 वृश्चिक
नवीन उपक्रम राबविण्याची संधी मिळेल. घरच्यांसाठी खरेदी कराल. अविवाहितांचे विवाह जुळून येण्याचे योग. नोकरीत विनाकारण वाद घालू नये. नोकरी सोडण्याचे विचार मनात येतील.
🏹 धनु
चांगल्या लोकांचे घरी येणे-जाणे राहील. वास्तुत आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपल्या बोलण्याने दुसर दुखावेल. खेळाडूंसाठी उत्तम दिवस. मित्र-मैत्रिणींशी वाद घालू नका.

🦌 मकर
विमा एजंट, इस्टेट, कमिशन या क्षेत्रात उत्तम संधी मिळतील. शेअर्स, सट्टा यात विचार करूनच गुंतवणूक करावी. सरकारी वर्गाने लाल घेऊ नये. पुढे त्रास होईल. विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल दिवस आहे.
🍯 कुंभ 
दुसर्‍यांसाठी मदतीचा हात पुढे कराल. गॉड फादरची नोकरदारांना मदत मिळेल. कोणालाही उसने पैसे दिल्यास परत येणार नाहीत. नातेवाईकांशी वाद घालू नये. उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता.

🦈 मीन
लग्नातील गुरू सर्व क्षेत्रात उत्साही ठेवेल. उद्योग व्यवसायासाठी समोरून सकारात्मक निर्णय मिळतील. एजंटसाठी अनुकूल दिवस. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. प्रेमात यश मिळेल. वायफळ खर्च टाळा.
बातमी व जाहिराती साठी संपर्क : 9011152179/7218187198

हृदयद्रावक घटना : कार विहिरीत कोसळून आई लेकीसह त्यांना वाचविणारा ही एक जण बुडून ठार


सह्याद्री चौफेर/न्यूज
9011152179

देऊळगाव राजा : देऊलगावराजा शहरातील चिखली रोड लगत रामनगर येथे राहणाऱ्या मुरकुटे परिवारावर काळाची झडप-समोर दुचाकी आल्याने कार शिकणाऱ्या महिलेने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने सुसाट कार घराजवळ नगरातील रोड ला लागून असलेल्या व कुठल्याही प्रकारचे कुंपण नसलेल्या विहरीत कोसळली, सदर हृदयद्रावक घटना दुपारी बाराच्या सुमारास स्थानिक देऊलगावराजा येथील चिखली रोड लगत असलेल्या रामनगर येथे घडली. 
सदर अपघातात कारचालक महिलेसह लेक पाण्यात बुडाली तर शिक्षक पती गंभीर जखमी अवस्थेत जवळच असलेल्या एका आर्मी जवानांनी जिवंत बाहेर काढला .
दरम्यान मृतदेह काढताना स्थानिक प्रशाशनाच्या कोणत्याही कर्मचारी यांना बचाव आणीबाणी प्रसंगी न दिलेल्या ट्रेनिंग अभावी विहरितील कार व मृत्यूदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक गोताखोर तरुण समोर येऊन मदत करीत असतानाच बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पवन पिंपळे हा विहरीत उडी घेतलेला युवक ही पाण्यात बुडाल्याने विहरितील मृतकाची संख्या तीन झाली आहे.
तब्बल सहा तासानंतर ही मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक देऊलगावराजा येथील प्रशासनाला यश आले नव्हते.
 याबाबत प्राप्त माहितीनुसार ढोरवी येथील अमोल मुरकुट हे जाफराबाद तालुक्यातील नळणी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे शहरातील रामनगर येथे वास्तव्याला असून आपल्या पत्नीला कार शिकवण्या साठी घरासमोरून निघाले त्यावेळी त्यांची पत्नी कार चालवीत होती, मुलगी समोर व शिक्षक अमोल मुरकुट मागे बसेल होते. कार सुरू करून हाकेच्या अंतरावर कार समोर आलेल्या दुचाकीला वाचविण्यासाठी महिलेने ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबल्याने सुसाट वेगाने घराजवळच असलेल्या रोड लगतच्या विना कुंपण असलेल्या पडक्या विहिरीत कार कोसळली. कारचे दार उघडून शिक्षक पाण्याबाहेर आले असता नागरिकांनी व आर्मीतील जवान यांनी त्यांना बाहेर काढले. त्यांच्या हाताला मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जयवंत सातव तहसीलदार श्याम धनमने पोलीस कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान मृतदेह बाहेर काढण्या साठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. विहीर ६० फूट खोल आणि पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने पाणी उपसा साठी सिंदखेडराजा देऊळगाव राजा नगरपालिकेचे अग्निशमन दल, जालना येथील अग्निशमन बोलविण्यात आले होते परंतु देऊलगावराजा येथील अग्निशामक दलाची गाडीतील पाणी उपसा मोटर पम्प नसल्याने साध्या विहरितील मोटार पंप च्या साह्याने पाणी उपसण्यास सुरुवात केली,
 तसेच पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यासाठी स्थानिक खाजगी क्रेन बोलवून मदतकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान मृतदेह बाहेर काढताना देऊळगाव मही येथील ज्ञानू शिंगणे हा युवक दूर घेऊन पाण्यात गेला दोनदा त्याने कारला दोरी बांधली मात्र दोन्ही वेळेस दोर तुटल्याने कार पुन्हा पाण्यात कोसळली. तिसऱ्या वेळेस त्याने उडी घेतली त्यावेळी त्याला फिट आला ही बाब ओळखून संजय नगर येथील युवकाने लगेच उडी घेऊन बेशुद्ध पडलेल्या ज्ञानू शिंगणे यास बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर अक्षय गुट्टे यांनी ॲम्बुलन्स द्वारे ज्ञानू शिंगणे यास ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीचे उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले. 
सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतरही मृतदेह काढण्यात अपयश आले होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने मदत कार्यात प्रशासनाला अडथळे निर्माण होत होते. दरम्यान विहिरीजवळ उभ्या असलेल्या गर्दीतून शहरातील पवन तोताराम पिंपळे या २२ वर्षीय युवकाने कपडे काढून विहिरीत उडी घेतली.आणि तो खूप वेळ बाहेर आला नाही तोही पाण्यात बुडाल्याने सदर विहिरीत स्वाती अमोल मुरकुट वय ३५ वर्ष, सिद्धी अमोल मुरकुट वय ११ वर्ष, आणि मृतदेह काढण्यासाठी उतरलेला पवन पिंपळे तिघेही विहिरीत बुडाले आहे.
माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी घटनास्थळी भेट दिली व तहसीलदार व ठाणेदार यांच्याशी बचाव कार्याबद्दल माहिती घेतली यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील कमिशनर यांना दूरध्वनी वर बोलून आपत्कालीन बचाव दल पाचारण करण्यात आले.
त्यानंतर माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी सुद्धा घटना स्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
शेवटी औरंगाबाद वरून तात्काळ आणीबाणी रेस्कू टीम आल्याले सायंकाळी सात वाजता विहरीतून कार सह मृत्यूदेह बाहेर काढण्यात औरंगाबाद च्या टीम ला यश आले .



नातेवाईकांचा टाहो :
 पाण्यात स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट या आई लेकी बुडालेल्या ची वार्ता ढोरवी व टाकरखेड वायाळ येथे माहित झाल्यावर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले व घडलेल्या हृदयाद्रावक घटने बद्दल त्यांनी एकच टाहो फोडला. यावेळी उपस्थित स्थानिक रामनगर व देऊलगावराजा शहरातील नागरिकांवर शोककळा पसरून तेथील नागरिक व महिलाही भावुक झाल्या होत्या.
हा भाग कुंभारी ग्रामपंचायत मध्ये येतो ,
नगर रचना किंवा प्लॉटिंग करतांना रोड चा विचार करून प्लांट पाडल्या जावेत व रोड लगत असलेल्या अश्या जीवघेण्या नादुरुस्त विहिरी व नाले बुजूउन नंतर प्लांट पाडणाऱ्याना संमती आदेश दयावेत जेणेकरून अश्या प्रकारच्या जीवघेण्या घटना घडणार नाहीत त्यामुळे काही नागरिक व महिलांमध्ये नगरपालिका प्रशासन व कुंभारी ग्रामपंचायत यांच्यावर रोष बघायला मिळाला.

जिल्हाधिकारी गौडा यांनी घेतला मूल-सावली तालुक्याचा आढावा, मूल येथे पार पडली आढावा बैठक....

 सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
9623494935

सावली : चंद्रपूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मूल येथे भेट देऊन स्थानिक उपविभागीय कार्यालयात मूल आणि सावली तालुक्यातील विविध विकास काम आणि शासकीय कार्यालयाचा आढावा घेतला व सर्व विभागांनी जनतेला ञास होणार नाही यादृष्टीने आपले काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.
महसूल, ग्रामविकास, कृषी, नगर तालुकास्तरावर या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी विनय गौड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी जिल्हाधिका-यांनी आसोलामेंढा धरणाची उंची वाढविणे, त्यामुळे होणारे परिणाम व उपाययोजना बद्दल आढावा घेतला. तसेच चिचडोह बॅरेजबदद्दल माहिती जाणून घेतली. मूल व सावली तालुक्यात मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणेने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. कृषी विभागाने रबी हंगामक्षेत्र वाढीकरीता योग्य नियोजन करावे. पीएमकिसान मधील शिल्लक लाभार्थ्यांना गावनिहाय शोधून त्यांच्यापर्यंत पोहचणे आणि योजना सर्वव्यापक करणे, अतिवृष्टी पीक नुकसान अनुदान १००% लाभार्थ्यांच्या खात्यात टाकणे आदींबाबत सुचनाही केल्या.
मूल येथील डाँ,पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाची प्रस्तावित जागा व रेल्वे मालधक्का संदर्भात चर्चा करून प्रत्यक्ष जागेची पाहणी करून विषय समजावून घेतले. रोहयो अंतर्गत मामा तलाव कामाचीही त्यांनी पाहणी केली.
यावेळी उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रवींद्र होळी, गटविकास अधिकारी देव गुणावत, ठाणेदार सतिशसिंह राजपूत, सावलीचे तहसीलदार परिक्षीत पाटील, सावलीच्या गटविकास अधिकारी सुनिता मरसकोल्हे व इतर अधिकारी उपस्थित होते.

सरस फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांची पसंती

सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

नवी दिल्ली : सरस फूड फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थांना खवय्यांनी पसंती दिली असून दिल्लीकर खवय्ये वडापाव, मिसळपाव, आगरी मटण तसेच चिकन आणि पुरणपोळीचा मनसोक्त आस्वाद घेत आहेत.

बाबा खडक सिंग मार्गस्थित एम्पोरियम भवन परिसरात सरस फूड फेस्टिव्हल 2022 चे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये 17 राज्यांची 21 खाद्यपदार्थांची दालने आहेत. बचत गटांच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या पक्वान्नांना येथे मांडण्यात आलेले आहे. यामध्ये महाराष्ट्राची दोन दालने आहेत. एक नंदूरबार आणि दुसरे ठाण्यातील आहे

राजधानीत सध्या थंडीची चाहूल लागली आहे. अशा वातावरणामध्ये या परिसरात सर्वत्र राज्या-राज्यातील देशी खाद्य पदार्थांचा खमंग सुवास दरवळतो आहे. हिमाचल प्रदेश ते केरळपर्यंतच्या खवय्यांना आवडणारे शाकाहारीसह मांसाहारी पदार्थ ताजे वाढले जात आहेत.

यात महाराष्ट्राचा वडापाव, दाबेली, मिसळपाव, तोंडाला पाणी सोडतात तर पुरण पोळीने जिभेवर एक वेगळेच समाधान मिळत असल्याचे येथे दिसून आले. हे अधिक खाल्ले जाणारे पदार्थ ‘दशमा’ महिला बचत गट, नंदूरबार येथील आहेत. तर कोल्हापूर मटण नुसत ऐकूण असणारे खवय्ये डोळयात पाणी आणूनही खाण्यात दंग दिसले. यासह आगरी मटण, आगरी चिकण, कोळंबी रस्सा, भात, पोळी, तांदळाची भाकरी हे दिल्लीकरांसाठी नवीन असणारे पदार्थही खवय्ये चाखूण पाहत आहेत. हे दालन श्री कृपा बचत गट, ठाणे यांचे आहे.

प्रथमच देशाच्या राजधानीत स्टॉल्स लावण्याची संधी मिळाल्याने सुरूवातीला असणारी धाकधूक खवय्यांनी ‘और एक’ अशी फर्माईश करत दूर करून आत्मविश्वास वाढला. घरी जे पदार्थ सहज बनविले जातात तेच पदार्थ इतर राज्यातील लोकांपुढे मांडताना शेफ म्हणून टॅग लागतो तेव्हा मन सुखवून जाते अशी प्रतिक्रिया या बचत गटातील महिलांनी दिली.

या ठिकाणी खवय्यांनी खाद्यपदार्थांचा निवांत आस्वाद घ्यावा, यासाठी टोकन व्यवस्था केलेली आहे. स्टॉल्स आकर्षक आणि स्वच्छ आहेत. या ठिकाणी दररोज एक सांस्कृतिक कार्यक्रमही दाखविण्यात येतो. हे फूड फेस्टिव्हल 27 ऑक्टोबरपासून सुरू झाले असून ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत विनाशुल्क सर्वांसाठी खुले आहे.