चक्क गावातील विहीरीत पडला बिबट्या

सह्याद्री चौफेर | उमेश गोलेपल्लीवार
9623494935

ब्रम्हपुरी : तालुक्यातील किटाळी (बोद्रा) गावातील एका विहिरित बिबट्या पडल्याची घटना आज दिनांक 4/11/2022 ला अंदाजे पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्तांत असे आहे की,ब्रम्हपुरी तालुक्यातील चारही बाजूने घनदाट अरण्याने व्याप्त असलेल्या किटाळी (बोद्रा) गावातील संतोष मेश्राम यांच्या घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. विहिरीमध्ये बिबट्याच्या डरकाळीचा आवाज विहिरीजवळ असलेल्या घरातील लोकांना ऐकू आला. कशाचा आवाज आहे म्हणुन विहिरीजवळ जावून बघतात तर, काय चक्क? विहिरीत बिबट्या पडलेला होता ही माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली. लगेचच घटनास्थळाकडे वनविभागाची चमूने धाव घेतली. दरम्यान, बघ्यांची एकच गर्दी जमली होती.

तसेच एक ते दोन तासानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीच्या बाहेर काढण्यात वनविभागाच्या चमूला यश आले. व बिबट्याला नेण्यात आले.