वणीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची निशुल्क नोंदणी सुरू


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष, विकासपुरुष आमदार मा.संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री "माझी लाडकी बहिण" योजनेचे नोंदणी फॉर्म निशुल्क भरुन देण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात उद्या दिनांक 8 जुलै पासून सुरू होत आहे.

या योजनेचे फॉर्म निःशुल्क पणे बसस्टॉप समोर, टिळक चौक, दिपक चौपाटी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळ, इंगोले मेडिकल जवळ, राम शेवाळकर परिसर या ठिकाणी भरून देण्यात येणार आहे. 
       
यासाठी पुढील प्रमाणे कागदपत्र आवश्यक आहेत. अधिवास प्रमाणपत्र किंवा 15 वर्षापुर्वीचे रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्म दाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (2.50 लाख उत्पन्न मयदिपर्यंतेचे) किंवा पिवळे / केशरी रेशन कार्ड , परराज्यातील जन्म झालेली महिला असल्यास किंवा महाराष्ट्रातील पुरुषासोबत विवाह झाला असल्यास 1) पतीचा जन्म दाखला, 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र 3) अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे. यासोबत बँक खात्याच्या पासबूकची पहिल्या पानाची छायांकीत पत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो आवश्यक आहे. 
          
वणी विधानसभा क्षेत्रातील सर्व पात्र महिला भगिनींनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याकरिता वरील ठिकाणी आपला फॉर्म निःशुल्क भरून घ्यावा, असे आव्हान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.
वणीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची निशुल्क नोंदणी सुरू वणीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची निशुल्क नोंदणी सुरू Reviewed by सह्याद्री चौफेर on July 07, 2024 Rating: 5
Powered by Blogger.