जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा जाईल
🐏 मेष
धार्मिक आणि सामाजिक कार्याला हातभार लावाल. ज्यांचे कोर्ट-कचेरीच्या समस्या आहेत त्या मार्गी लागतील. परदेशात जाण्यासाठी अनुकूल दिवस. जोडीदाराशी तडजोड स्वीकारावी. व्यापारी उधारी करू नये.
🦬 वृषभ
व्यापारी वर्गासाठी अनुकूल दिवस. केवळ व्यवहार करताना कदाचित चिडचिड होण्याची शक्यता असल्यामुळे शांत रहावे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात खोटी आश्वासने देवू नयेत. आजारी व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी. अभ्यासात बौद्धीक मदत मिळेल.
👩❤️👨 मिथुन
नोकरदारांनी स्वताची जबाबदारी दुसर्यांवर टाकू नये. खेळ, कला क्षेत्रात उत्तम संधी मिळेल. अविवाहितांचे विवाह जुळूनयेण्याचे योग आहेत. जोडीदारासाठी हौशीने खर्च कराल. अभ्यासाव्यतिरिक्त दुसर्या गोष्टीत मन रमेल.
🦀 कर्क
व्यापारी वर्गाने व्यवसायात मोठी गुंतवणूक करू नये. सरकारी नोकरदारांची बदलीचे योग संभवतात. खाजगी नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी मिळेल. प्रिय व्यक्तींशी वाद घालू नये. गुंतवणूक करताना घाईत निर्णय घेऊ नये.
🦁 सिंह
उत्साहवर्धक दिवस. प्रिय व्यक्तींशी गाठभेट होण्याची शक्यता. परंतु, समोरच्या व्यक्तीच्या लहरीपणाचा अनुभव येऊ शकतो. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. अभ्यासाला गुरूजनांची मदत मिळेल. हाताला दुखपत होण्याची शक्यता आहे.
👧🏻 कन्या
भागीदारीत किंवा महत्वाच्या गोष्टींसाठी करारपत्र करण्यास अनुकूल दिवस. धार्मिक गोष्टींत सहभाग घ्याल. कौटुंबिक गोष्टीत काही घटना मनाविरूद्ध होण्याची शक्यता आहे. काहींना विनाकारण मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता आहे.
⚖️ तुळ
ज्यांचे परदेशात जाण्याचे ठरत आहे त्यांनी जास्त प्रयत्न करावे. खेळ, कमिशन, कला, जाहीरात क्षेत्रात यश मिळेल. प्रेमसंबंधात जोडीदाराशी वाद घालू नये. व्यापारी वर्गासाठी मध्यम दिवस. जुगार, सट्टावर पैसे खर्च करू नये.
🦂 वृश्चिक
नवीन उपक्रम राबविण्याची संधी मिळेल. घरच्यांसाठी खरेदी कराल. अविवाहितांचे विवाह जुळून येण्याचे योग. नोकरीत विनाकारण वाद घालू नये. नोकरी सोडण्याचे विचार मनात येतील.
🏹 धनु
चांगल्या लोकांचे घरी येणे-जाणे राहील. वास्तुत आनंदी वातावरण ठेवण्याचा प्रयत्न कराल. आपल्या बोलण्याने दुसर दुखावेल. खेळाडूंसाठी उत्तम दिवस. मित्र-मैत्रिणींशी वाद घालू नका.
🦌 मकर
विमा एजंट, इस्टेट, कमिशन या क्षेत्रात उत्तम संधी मिळतील. शेअर्स, सट्टा यात विचार करूनच गुंतवणूक करावी. सरकारी वर्गाने लाल घेऊ नये. पुढे त्रास होईल. विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल दिवस आहे.
🍯 कुंभ
दुसर्यांसाठी मदतीचा हात पुढे कराल. गॉड फादरची नोकरदारांना मदत मिळेल. कोणालाही उसने पैसे दिल्यास परत येणार नाहीत. नातेवाईकांशी वाद घालू नये. उष्णतेचे त्रास होण्याची शक्यता.
🦈 मीन
लग्नातील गुरू सर्व क्षेत्रात उत्साही ठेवेल. उद्योग व्यवसायासाठी समोरून सकारात्मक निर्णय मिळतील. एजंटसाठी अनुकूल दिवस. विद्यार्थी वर्गाने अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नये. प्रेमात यश मिळेल. वायफळ खर्च टाळा.
बातमी व जाहिराती साठी संपर्क : 9011152179/7218187198