सह्याद्री चौफेर/न्यूज
9011152179
देऊळगाव राजा : देऊलगावराजा शहरातील चिखली रोड लगत रामनगर येथे राहणाऱ्या मुरकुटे परिवारावर काळाची झडप-समोर दुचाकी आल्याने कार शिकणाऱ्या महिलेने ब्रेक ऐवजी एक्सलेटर दाबल्याने सुसाट कार घराजवळ नगरातील रोड ला लागून असलेल्या व कुठल्याही प्रकारचे कुंपण नसलेल्या विहरीत कोसळली, सदर हृदयद्रावक घटना दुपारी बाराच्या सुमारास स्थानिक देऊलगावराजा येथील चिखली रोड लगत असलेल्या रामनगर येथे घडली.
सदर अपघातात कारचालक महिलेसह लेक पाण्यात बुडाली तर शिक्षक पती गंभीर जखमी अवस्थेत जवळच असलेल्या एका आर्मी जवानांनी जिवंत बाहेर काढला .
दरम्यान मृतदेह काढताना स्थानिक प्रशाशनाच्या कोणत्याही कर्मचारी यांना बचाव आणीबाणी प्रसंगी न दिलेल्या ट्रेनिंग अभावी विहरितील कार व मृत्यूदेह बाहेर काढण्यासाठी स्थानिक गोताखोर तरुण समोर येऊन मदत करीत असतानाच बाबासाहेब आंबेडकर नगर येथील पवन पिंपळे हा विहरीत उडी घेतलेला युवक ही पाण्यात बुडाल्याने विहरितील मृतकाची संख्या तीन झाली आहे.
तब्बल सहा तासानंतर ही मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक देऊलगावराजा येथील प्रशासनाला यश आले नव्हते.
याबाबत प्राप्त माहितीनुसार ढोरवी येथील अमोल मुरकुट हे जाफराबाद तालुक्यातील नळणी जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे शहरातील रामनगर येथे वास्तव्याला असून आपल्या पत्नीला कार शिकवण्या साठी घरासमोरून निघाले त्यावेळी त्यांची पत्नी कार चालवीत होती, मुलगी समोर व शिक्षक अमोल मुरकुट मागे बसेल होते. कार सुरू करून हाकेच्या अंतरावर कार समोर आलेल्या दुचाकीला वाचविण्यासाठी महिलेने ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबल्याने सुसाट वेगाने घराजवळच असलेल्या रोड लगतच्या विना कुंपण असलेल्या पडक्या विहिरीत कार कोसळली. कारचे दार उघडून शिक्षक पाण्याबाहेर आले असता नागरिकांनी व आर्मीतील जवान यांनी त्यांना बाहेर काढले. त्यांच्या हाताला मार लागल्याने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जयवंत सातव तहसीलदार श्याम धनमने पोलीस कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी आणि नगरपालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दरम्यान मृतदेह बाहेर काढण्या साठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. विहीर ६० फूट खोल आणि पाण्याने तुडुंब भरलेली असल्याने पाणी उपसा साठी सिंदखेडराजा देऊळगाव राजा नगरपालिकेचे अग्निशमन दल, जालना येथील अग्निशमन बोलविण्यात आले होते परंतु देऊलगावराजा येथील अग्निशामक दलाची गाडीतील पाणी उपसा मोटर पम्प नसल्याने साध्या विहरितील मोटार पंप च्या साह्याने पाणी उपसण्यास सुरुवात केली,
तसेच पाण्यात बुडालेली कार बाहेर काढण्यासाठी स्थानिक खाजगी क्रेन बोलवून मदतकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान मृतदेह बाहेर काढताना देऊळगाव मही येथील ज्ञानू शिंगणे हा युवक दूर घेऊन पाण्यात गेला दोनदा त्याने कारला दोरी बांधली मात्र दोन्ही वेळेस दोर तुटल्याने कार पुन्हा पाण्यात कोसळली. तिसऱ्या वेळेस त्याने उडी घेतली त्यावेळी त्याला फिट आला ही बाब ओळखून संजय नगर येथील युवकाने लगेच उडी घेऊन बेशुद्ध पडलेल्या ज्ञानू शिंगणे यास बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर अक्षय गुट्टे यांनी ॲम्बुलन्स द्वारे ज्ञानू शिंगणे यास ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तातडीचे उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले.
सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतरही मृतदेह काढण्यात अपयश आले होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने मदत कार्यात प्रशासनाला अडथळे निर्माण होत होते. दरम्यान विहिरीजवळ उभ्या असलेल्या गर्दीतून शहरातील पवन तोताराम पिंपळे या २२ वर्षीय युवकाने कपडे काढून विहिरीत उडी घेतली.आणि तो खूप वेळ बाहेर आला नाही तोही पाण्यात बुडाल्याने सदर विहिरीत स्वाती अमोल मुरकुट वय ३५ वर्ष, सिद्धी अमोल मुरकुट वय ११ वर्ष, आणि मृतदेह काढण्यासाठी उतरलेला पवन पिंपळे तिघेही विहिरीत बुडाले आहे.
माजी मंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी घटनास्थळी भेट दिली व तहसीलदार व ठाणेदार यांच्याशी बचाव कार्याबद्दल माहिती घेतली यावेळी त्यांनी औरंगाबाद येथील कमिशनर यांना दूरध्वनी वर बोलून आपत्कालीन बचाव दल पाचारण करण्यात आले.
त्यानंतर माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी सुद्धा घटना स्थळाला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
शेवटी औरंगाबाद वरून तात्काळ आणीबाणी रेस्कू टीम आल्याले सायंकाळी सात वाजता विहरीतून कार सह मृत्यूदेह बाहेर काढण्यात औरंगाबाद च्या टीम ला यश आले .
नातेवाईकांचा टाहो :
पाण्यात स्वाती मुरकुट व सिद्धी मुरकुट या आई लेकी बुडालेल्या ची वार्ता ढोरवी व टाकरखेड वायाळ येथे माहित झाल्यावर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले व घडलेल्या हृदयाद्रावक घटने बद्दल त्यांनी एकच टाहो फोडला. यावेळी उपस्थित स्थानिक रामनगर व देऊलगावराजा शहरातील नागरिकांवर शोककळा पसरून तेथील नागरिक व महिलाही भावुक झाल्या होत्या.
हा भाग कुंभारी ग्रामपंचायत मध्ये येतो ,
नगर रचना किंवा प्लॉटिंग करतांना रोड चा विचार करून प्लांट पाडल्या जावेत व रोड लगत असलेल्या अश्या जीवघेण्या नादुरुस्त विहिरी व नाले बुजूउन नंतर प्लांट पाडणाऱ्याना संमती आदेश दयावेत जेणेकरून अश्या प्रकारच्या जीवघेण्या घटना घडणार नाहीत त्यामुळे काही नागरिक व महिलांमध्ये नगरपालिका प्रशासन व कुंभारी ग्रामपंचायत यांच्यावर रोष बघायला मिळाला.