नंदकुमार मस्के | सह्याद्री चौफेर
महागांव : तालुक्यातील जि.प. प्रा. मराठी शाळा वरोडी (जुनी) येथे मागील 4 वर्षापासून शाळेत कायमस्वरुपी एकही शिक्षक नाही. सद्यस्थितीत शाळेची पटसंख्या 70 च्या जवळपास आहे. शासन नियमानुसार शाळेत 3 शिक्षकांची नियुक्ती असणे गरजेचे आहे. परंतु कायम स्वरुपी एकही शिक्षक नाही.मागील चार वर्षापासून श्री. के. ई. भोयर हे शिक्षक प्रती नियुक्तीवर दिलेले आहेत परंतु पाच वर्ग मुख्याध्यापक प्रभाग त्यात BLO चे काम माहितीची देवाण घेवाण करण्यासाठी त्यांना टेंभी व महागांव येथे जावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच पालकवर्ग सुध्दा आपल्या पाल्याच्या भविष्याबाबत चिंतेत आहेत. यापुर्वी सुध्दा आपणांकडे निवेदन सादर केलेले आहे. परंतु अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या निवेदनाव्दारे आपणांस पुनश्च आग्रही विनंती मागणी करण्यात येते की, आमच्या शाळेत अजून एकतरी शिक्षकाची नियुक्ती करुन आम्हाला न्याय देण्यात यावा. असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे. परंतु गेली पंधरा ते विस दिवस लोटूनही शिक्षण विभागाने दखल घेतली नसल्याने शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय निवेदन कर्त्यांनी घेतला.
यावेळी उपसरपंच अडकीने यांच्या शी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, बि ओ म्हणतात एक शिक्षक नेमला आहे. नेमला..परंतु तो शाळेवर येत का नाही. असा सवाल उपस्थित करत पुढे म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे आणि यांना अजिबात देणंघेणं नाही. त्यामुळे आज कुलूप ठोकले, जर शिक्षक शाळेवर हजर झाले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आंदोलनाचा प्रवित्रा लगेचच घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती पालक वर्ग दत्ता चौधरी (शाळा व्य. स. अध्यक्ष), सौ. उषाताई पेंडागळे (शाळा व्य. स. उपाध्यक्ष) तसेच सदस्य अर्चनाताई कोमवाड, सविताताई कांबळे, आरती ताई अडकिने ,पालक वर्ग अरविंद अडकिने, अनिल कदम, जीवन कनवाले, संदीप जाधव, परमेश्वर चंद्रवशी, प्रकाश काळुंके, प्रवीण कोणप्रतिवार, सुनील जाधव, अनंतराव अडकिने, अमोल अडकिने यांच्या निवेदनावर सह्या आहेत.
त्यामुळे विद्यार्थ्यांना "गुरुजी" मिळेल का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.