सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : सागर झेप बहुउद्देशीय संस्थे मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त "हर घर तिरंगा" या अभियानात दिनांक 13 ते 15 आगस्ट दरम्यान देशातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. यासाठी वणी पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील शिरपूर, पुनवट, नायगाव, केसुरली, मंदर या गावात कार्यक्रम करण्यात आला. घरोघरी राष्ट्रीय ध्वज लावून अमृत महोत्सव साजरा करावा असे कला पथका द्वारे जनजागृती करण्यात आली आहे. "हर घर तिरंगा" या अभियाना अंतर्गत समस्त जनतेने राष्ट्रध्वज घेऊन घरी लावावा. तसेच नागरिकांनी राष्ट्रध्वजाची मागणी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, स्वस्त धान्य दुकान, पोस्ट ऑफिस यांच्याकडे नोंदवू शकता किंवा इतर ठिकाणावरून खरेदी करू शकता व प्रत्येकाला खरेदी करण्यासाठी योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आला असून फक्त 25 रुपये किंमत आहे. अशी माहिती कलावंत अभिनयाद्वारे सांगत आहे. श्रुती कोठे, मयुरी वैद्य, साई दुधलकर, करण ढुरके, सनवर शेख, रवी शेगर, अंकुश झाडे, गौरव नायनवार, साहिल चिंचोलकर, निखिल वाघाडे, मिमिक्री व ढोलक आकाश महादूळे, सागर मुने यांनी कार्यक्रम सादर केला.