टॉप बातम्या

रॅलीतून साकारली 'हर घर तिरंगा' मोहीम..

चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा प्राथमिक मराठी पाथ्रड देवी येथे केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा मोहीम 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राबवली जात आहे त्या अनुषंगाने पाथ्रड देवि येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने दि.10 ऑगष्ट 2022 बुधवारला हर घर तिरंगा उपक्रमाला उत्साह पूर्ण लोक सहभाग मिळावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर घरोघरी तिरंगा उत्सव प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचा असून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीतील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा असे यावेळी सांगण्यात आले. शेवटी रॅलीची पाथ्रड देवी जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आली आहे त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू व चित्रे यांचे प्रदर्शनी आयोजित केली होती.


या प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी केलेल्या कौशल्याने व कल्पकतेने वस्तू बाबत जि.प.शाळा समिती व्यवस्थापक ओमशिव राठोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यानंतर जि प शाळेचे मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम यांनी हर घर तिरंग्याबाबत आपले मनोगत व्यक्त केले. गावकऱ्यांनी प्रत्येक घरी तिरंगा लावून आपले कर्तव्य पार पाडावे असे यावेळी सांगण्यात आले असून शाळेचे मुख्याध्यापिका रोहनकर मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेत समितीचे सदस्य प्रेम चव्हाण,अंकुश पारीसे,प्रीती गायकवाड पुनम पवार,मनवार,नामदेव जाधव यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();