मनसे नगरसेवकाला शिवागीळ; कार्यवाही करा अन्यथा आंदोलन छेडणार

नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर

झरी : झरी जामणी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तणूकीची भाषा वापरल्याबाबत नगरसेवकाने तहसीलदार यांना निवेदनातून कार्यवाहीची मागणी केली. 
सविस्तर असे की, झरी येथील नगरसेवक प्रवीण वासुदेव लेनगुळे यांना खिळा लागल्यामुळे ते टी.टी चे इंजेक्शन घेण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात सकाळी ०९.३० ला ते गेले असता, त्यांनी सर्वप्रथम नाव नोंदणी करून पावती घेऊन ते डॉक्टर च्या रूम मध्ये गेले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना प्रिस्कीप्शन दिले व ते मेडीसिन विभागामध्ये गेले असता तेथील कर्मचारी निष्णांत नंदगिरीवार ब्रदर यांनी अबे तु बे च्या भाषेचा वापर केला. प्रवीण लेनगुळे हे नगरसेवक असून आपल्या ग्रामीण रुग्णालय विभागातील कर्मचाऱ्याच्या अशा प्रकारच्या भाषेचा उल्लेख करणे अशोभनीय व गंभीर बाब आहे असे नगरसेवक लेनगुळे यांनी निवेदनातून म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, मी वार्ड प्रतिनिधी असून मला अशा प्रकारची गैरवर्तणूकीची भाषेचा वापर करीत असेल तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो, तसेच झरी जामणी येथील ग्रामीण रुग्णालयामधून जनतेच्या बऱ्याच तक्रारी येत असून स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही उचित कार्यवाही केल्या जात नाही.त्यामुळे या अकार्यक्षम कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी व याबाबत मला अवगत करावे असे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा नगरसेवक लेनगुळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आला आहे.

बोरी अरब महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ २०२२' संपन्न


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : बोरी अरब स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथे उन्हाळी २०२१ परीक्षेमध्ये पदवी प्राप्त केलेल्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील ढेर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अजय पातालबंसी प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय राळेगाव. प्रमुख उपस्थितीत नवसंजीवन शिक्षणप्रसारक मंडळ दारव्हाचे व्यवस्थापक श्री अशोकरावजी ठाकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे व्यवस्थापक श्री जगन्नाथराव बोरकर हे उपस्थित होते तसेच आयक्युएं की समन्वयक डॉ असरार खान, वाणिज्य विभागार्थ प्रा. डॉ. विकास निघोट व कला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्र बुटले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पुनाने व दिपप्रज्वलनाने झाली या नंतर कला व वाणिज्य शाखेच्या पदवी प्राप्त विद्यार्थ्याना मा अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आले. दिक्षांत भाषणामध्ये प्राचार्य डॉ. अजय पातालबंसी यांनी पदवी प्राप्त करणाया विद्यार्थ्यांना पदवीनंतरच्या संधीचे महत्त्व विषद केले. पुढिल काळात परिस्थितीला तोंड देण्यासाठी पदविधारानी व्यावहारिक जीवनाच्या अनेक पैलूंना आत्मसात करावे असे त्यांनी सांगीतले व्यवस्थापक श्री अशोकराव ठाकरे यानी आपल्या शुभेच्छापर मनोगतातून संस्थेचा दृष्टिकोन मांडुन पदवीधारकाना भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी चिकाटी व सातव्य टिकविण्याचा सल्ला दिला. दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतातुन मानवी मूल्यांची जडण घडण जीवनातील चढउतार या बाबींचा सामना करून पुढील यशाचा मार्ग निवडण्याची संधी या पदवीमुळे आपणाला प्राप्त झाल्याचे डॉ. सुनील डरे यानी सांगीतले.
उन्हाळी २०२१ या परीक्षेत वाणिज्य शाखेत एकुण ३२ व मला शाखेत एकुण ५५ विद्यार्थी उतिर्ण झालेत. त्यापैकी प्रतीनिधीक स्वरूपामध्ये कला शाखचे २७ विद्यार्थी आणि पाणिज्य शाखेच्या १९ विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ असरार खान यांनी संचालन प्रा. अतुल सारखे तर आभार प्रा. डॉ. दीपक कुटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वित करीता हो पवार, डॉ भाकरे, डॉ. निघोट, डॉ. नाईक प्रा तेलगोटे डॉ. बोडे, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

लिंगटी येथील नाल्यावरील रपटा पुरात गेला वाहून


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : मुकूटबन, पाटण ते आदिलाबाद या मार्गाचे नाल्यावरील लिंगटी पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. मे महिन्यात उन्हाळ्यातच काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा तयार करून दिला. मात्र, लिंगटी नाल्याला आलेल्या पुरामुळे पहिल्या पावसातच तो टाकलेला रपटा वाहून गेल्याने सोमवारी रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे पाटण व परप्रांतीय तेलंगणात जाण्याचा संपर्क तुटला आहे.
मुकूटबन पाटण मार्गावरील लिंगटी येथील नाल्यावरील पूल एप्रिल महिन्यात तोडण्यात आला होता,मे महिन्यात पुलाचे म्हणजे उन्हाळ्यातच काम सुरु झाले. काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा (वळण रस्ता) तयार करून दिला. दोन महिन्यात या पुलाचे पिल्लर सुध्दा पूर्ण झाले नसून अजूनही या पुलाचे पन्नास टक्के सुध्दा काम झाले नाही. अशातच रविवारी व सोमवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे सदर नाल्याला पूर आला. यात कंत्राटदार कंपनीने पर्याय व्यवस्था म्हणून तयार केलेला रपटा (रस्ता) वाहून गेला त्यामुळे मुकूटबन पाटण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
 या मार्गाने होणारा तेलंगणा व पांढरकवडा तालुक्यांतील थेट संपर्क आता तुटला आहे. त्यामळे आता एखाद्या व्यक्तीला मुकूटबन वरून पाटण जायचे असेल तर रुईकोट, मांगली किंवा शेकापुर मार्गे झरी जामणी वरून पाटण ला जावे लागत आहे. पाटण येथूनच पांढरकवडा व तेलंगणात जाता येते. तूर्तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

मणीपुर येथील शहीद जवानांना बोपापुर येथे श्रद्धांजली अर्पण

निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर

झरी : तालुक्यातील बोपापुर येथे श्रद्धांजली पर कार्यक्रम
(ता ५ जुलै) रोजी घेण्यात आला. मणीपुर राज्यातील नेनो जिल्ह्यात भूस्खलनात शहीद जवनासह मुत्यमुखी पडलेल्या 81जणांना कॅण्डल लावून बोपापुर येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजक वैभव मिलिमीले, आकाशभाऊ सोनटक्के, प्रमुख मार्गदर्शक देविदासजी मडावी, बिरसा ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष मारुतीभाऊ आत्राम, तर 
कार्यक्रमाचे प्रास्ताविका विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हाउपाध्यक्ष गौरव पंधरे यांनी केली.
प्रमुख पाहूणे म्हणून ग्रा.सदस्य बंडुजी पेंदोर, ग्राम. मा. सरपंच विलासजी नैताम, नागेशभाऊ घुगुल तसेच डॉ. प्रवीण मत्ते व गावातील ग्रामस्थ महिला येलेकरताई, अनपूर्णा मेश्राम, कोडापेताई,
मडावीताई, पुरुष आनंदरावजी सोनटक्के, दिनेशभाऊ खाडे, बंडूभाऊ चांदेकर, संतोषभाऊ कोडापे, नागोभाऊ पेन्दोर, नेताजी मत्ते, गणेशभाऊ ढेंगळे यांच्या सह गावातील युवक अमोल मडावी, अमीर मंगाम, संदीप कोडापे, राहुल कोडापे, पवन पंधरे, रोहित नैताम, शुभम आत्राम तर ग्रामस्थ व युवक उपस्थित होते. 

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवकत्ते यांनी जपली सामाजिक बांधिलकी....


कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

किनवट : तालुक्यातील कमठाला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका सहकोषाध्यक्ष मारोती देवकते यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून इयत्ता पहिली ते सातवी च्या सर्व विद्यार्थांना एक वही व एक पेन अशी भेट देऊन सर्व विद्यार्थ्यां पुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका कोषाध्यक्ष मारोती देवकते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन अशी भेट दिली. कमठाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक अंकुश राऊत यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमा बद्दल माहिती सांगताना म्हणाले की, काही पुढारी व नेते आपला वाढदिवस साजरा करताना अनावश्यक ठिकाणी खर्च करतात,
बॅनरबाजी करुन खर्च करतात पण अशा शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक साहित्य वाटप करुन वाढदिवस साजरा करतांना दिसत नाहीत, तसेच लोकं मंदिर-मस्जिद या ठिकाणी दान - -धर्म करतात पण जे खरे विद्येचे मंदिर हे शाळा आहे इथे कुणीच लक्ष देत नाही पण पत्रकार मारोती देवकते यांनी त्यांचा वाढदिवस हा शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करुन केला हा उपक्रम खुपच स्तुत्य आहे. असा उपक्रम करुन मारोतीनी सर्व विद्यार्थ्यांपुढे, राजकीय नेत्यांपुढे एक चांगलाच आदर्श ठेवला आहे असे अंकुश राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे शरद सखाराम कुरुंदकर, प्रितम विठ्ठलराव पाटील, धनरेखा नागोराव सांगवीकर, अंकुश उत्तमराव राऊत, शिक्षकवृंद, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष आशिष शेळके तालुका सचिव नसीर तगाले, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील, तालुका उपाध्यक्ष शेख अतीफ, तालुका सरचिटणीस गौतम कांबळे, तालुका कोषाध्यक्ष रेहान खान, ता. सह सचिव प्रणय कोवे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गंगाधर कदम, तालुका संघटक राज माहुरकर, ता. संघटक अरविंद सुर्यवंशी, ता. संघटक प्रज्वल कारले,  ता.सह संघटक अक्रम चव्हाण, ता.सह संघटक परमेश्वर पेशवे, ता.सह संघटक इंद्रपाल कांबळे, रमेश परचाके सदस्य), शेख सईद सदस्य, विकास वाघमारे सदस्य, गणेश यमजलवाड सदस्य, विनोद कांबळे सदस्य आदीसह शालेय विद्यार्थी उपस्थित होते.