नितेश पत्रकार | सह्याद्री चौफेर
झरी : झरी जामणी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तणूकीची भाषा वापरल्याबाबत नगरसेवकाने तहसीलदार यांना निवेदनातून कार्यवाहीची मागणी केली.
सविस्तर असे की, झरी येथील नगरसेवक प्रवीण वासुदेव लेनगुळे यांना खिळा लागल्यामुळे ते टी.टी चे इंजेक्शन घेण्याकरिता ग्रामीण रुग्णालयात सकाळी ०९.३० ला ते गेले असता, त्यांनी सर्वप्रथम नाव नोंदणी करून पावती घेऊन ते डॉक्टर च्या रूम मध्ये गेले, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना प्रिस्कीप्शन दिले व ते मेडीसिन विभागामध्ये गेले असता तेथील कर्मचारी निष्णांत नंदगिरीवार ब्रदर यांनी अबे तु बे च्या भाषेचा वापर केला. प्रवीण लेनगुळे हे नगरसेवक असून आपल्या ग्रामीण रुग्णालय विभागातील कर्मचाऱ्याच्या अशा प्रकारच्या भाषेचा उल्लेख करणे अशोभनीय व गंभीर बाब आहे असे नगरसेवक लेनगुळे यांनी निवेदनातून म्हटले आहे.
पुढे ते म्हणाले की, मी वार्ड प्रतिनिधी असून मला अशा प्रकारची गैरवर्तणूकीची भाषेचा वापर करीत असेल तर सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो, तसेच झरी जामणी येथील ग्रामीण रुग्णालयामधून जनतेच्या बऱ्याच तक्रारी येत असून स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही उचित कार्यवाही केल्या जात नाही.त्यामुळे या अकार्यक्षम कर्मचाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी व याबाबत मला अवगत करावे असे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा नगरसेवक लेनगुळे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आला आहे.
मनसे नगरसेवकाला शिवागीळ; कार्यवाही करा अन्यथा आंदोलन छेडणार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 06, 2022
Rating:
