चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : सध्याच्या युगात सर्वत्र दिवसेंदिवस मोबाईल इंटरनेटचे आकर्षण मुलांमध्ये वाढत आहे. बहुतांश घरात संवाद हरवत चालला आहे. 'दीड जीबी सारा गाव बीजी' अशी अवस्था सर्वांचीच झाली आहे. युवकांच्या वाढत्या व्यस्ततेमुळे कुटुंबियांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागतो.
सदर मोबाईल फोन वर सर्रास अघातीक व्हिडिओ टाकण्यात येते.ते व्हिडिओ तरुण युवा नवयुवक वर्ग बघुन मार्ग चुकतात किंबहुना वाम मार्गाने जातात या बाबत अनेक विध्यर्थीचे पालक यांच्याशी ग्रामीण भागातील व शहरी भागातील पालक वर्ग यांच्याशी संपर्क साधला त्यांनी वरिल प्रक्रीया आमच्या प्रतिनिधीशी सांगीतले.
मुले अल्पवयातच एक ना अनेक प्रकारच्या व्यसनाकडे वळत असल्याचे दिसते. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचा सामना पालक वर्गांना करावा लागत आहे. याकरिता जिल्हा तालुका स्तरावरून शाळांच्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मोबाईल व्यसनमुक्ती मार्गदर्शन केंद्रे चालवण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलात एकाकीपणा वाढत आहे. कारण अलीकडच्या काही वर्षात मोबाईल इंटरनेटचा विस्तार इतका प्रचंड झाला आहे की,त्याकडे कुणाचे ध्यानच गेले नाही.
'माझा मुलगा छान मोबाईल हाताळतो. त्याला मोबाईलमधलं सगळं काही जमतं' अशी कौतुकाची थाप पालक वर्ग मारत होती. मात्र, मुलं जस जशी त्यात गुरफटत गेली वास्तविक पालकांना भीती वाटायला लागली की मुलं आता हाताबाहेर जातील की काय,असा प्रश्न पालकांपुढे उपस्थित झाला आहे. या विषयी जन चर्चा आहे.
सोशल मीडियावरील व्यस्तता ठरते डोकेदुखी; इंटरनेटच्या डेटा वापरातच युवकांचा टाईमपास...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 07, 2022
Rating:
