नारायण डप्पडवाड यांची पीएसआय पदी पदोन्नती


बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर 

उदगीर : येथील व्हि. एन. के. नगरातील व सध्या देवणी पोलीस स्टेशन येथे सेवेत कार्यरत असलेले सहाय्यक फौजदार असलेले नारायण लिंगोजी डप्पडवाड पीएसआय पदी पदोन्नती झाली आहे.
डप्पडवाडांच्या सेवेच्या कालावधीत त्यांनी मुरुड, लातूर, उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे उत्कृष्ट कार्य केले असून, त्यांची पी. आय. एस. पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा व्हि. एन. के. नगरच्या वतिने सत्कार. व्हि. एन. के. नगरीचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय राठोड, सचिव सुधाकर मोहिते व उपाध्यक्ष अरविंद धनूरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तसेच पुढील कार्यास त्यांना शुभकामना देण्यात आल्या. 
या वेळी अनिरुद्ध रणसुभे यांचा अभिष्टचिंतन सोहळा करण्यात आला, दोघांनाही अमृतसंदेश ग्रंथ भेट देण्यात आला. याप्रसंगी व्ही.एन. के. नगरीची सर्व पदाधिकारी व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रास्ताविक व आभार सहसचिव राजेंद्र सास्तुरकर यांनी मांडले.
नारायण डप्पडवाड यांची पीएसआय पदी पदोन्नती नारायण डप्पडवाड यांची पीएसआय पदी पदोन्नती Reviewed by सह्याद्री चौफेर on July 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.