बोरी अरब महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ २०२२' संपन्न


चेतन पवार | सह्याद्री चौफेर 

दारव्हा : बोरी अरब स्थानिक कला व वाणिज्य महाविद्यालय, बोरी अरब येथे उन्हाळी २०२१ परीक्षेमध्ये पदवी प्राप्त केलेल्या कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा पदवी वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील ढेर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अजय पातालबंसी प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय राळेगाव. प्रमुख उपस्थितीत नवसंजीवन शिक्षणप्रसारक मंडळ दारव्हाचे व्यवस्थापक श्री अशोकरावजी ठाकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाचे व्यवस्थापक श्री जगन्नाथराव बोरकर हे उपस्थित होते तसेच आयक्युएं की समन्वयक डॉ असरार खान, वाणिज्य विभागार्थ प्रा. डॉ. विकास निघोट व कला विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. चंद्र बुटले हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पुनाने व दिपप्रज्वलनाने झाली या नंतर कला व वाणिज्य शाखेच्या पदवी प्राप्त विद्यार्थ्याना मा अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आले. दिक्षांत भाषणामध्ये प्राचार्य डॉ. अजय पातालबंसी यांनी पदवी प्राप्त करणाया विद्यार्थ्यांना पदवीनंतरच्या संधीचे महत्त्व विषद केले. पुढिल काळात परिस्थितीला तोंड देण्यासाठी पदविधारानी व्यावहारिक जीवनाच्या अनेक पैलूंना आत्मसात करावे असे त्यांनी सांगीतले व्यवस्थापक श्री अशोकराव ठाकरे यानी आपल्या शुभेच्छापर मनोगतातून संस्थेचा दृष्टिकोन मांडुन पदवीधारकाना भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी चिकाटी व सातव्य टिकविण्याचा सल्ला दिला. दिक्षांत समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतातुन मानवी मूल्यांची जडण घडण जीवनातील चढउतार या बाबींचा सामना करून पुढील यशाचा मार्ग निवडण्याची संधी या पदवीमुळे आपणाला प्राप्त झाल्याचे डॉ. सुनील डरे यानी सांगीतले.
उन्हाळी २०२१ या परीक्षेत वाणिज्य शाखेत एकुण ३२ व मला शाखेत एकुण ५५ विद्यार्थी उतिर्ण झालेत. त्यापैकी प्रतीनिधीक स्वरूपामध्ये कला शाखचे २७ विद्यार्थी आणि पाणिज्य शाखेच्या १९ विद्यार्थ्यांना मान्यवराच्या हस्ते पदवी वितरण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ असरार खान यांनी संचालन प्रा. अतुल सारखे तर आभार प्रा. डॉ. दीपक कुटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वित करीता हो पवार, डॉ भाकरे, डॉ. निघोट, डॉ. नाईक प्रा तेलगोटे डॉ. बोडे, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
बोरी अरब महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ २०२२' संपन्न बोरी अरब महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ २०२२' संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on July 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.