लिंगटी येथील नाल्यावरील रपटा पुरात गेला वाहून


योगेश मडावी | सह्याद्री चौफेर 

झरी : मुकूटबन, पाटण ते आदिलाबाद या मार्गाचे नाल्यावरील लिंगटी पुलाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. मे महिन्यात उन्हाळ्यातच काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा तयार करून दिला. मात्र, लिंगटी नाल्याला आलेल्या पुरामुळे पहिल्या पावसातच तो टाकलेला रपटा वाहून गेल्याने सोमवारी रात्रीपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे पाटण व परप्रांतीय तेलंगणात जाण्याचा संपर्क तुटला आहे.
मुकूटबन पाटण मार्गावरील लिंगटी येथील नाल्यावरील पूल एप्रिल महिन्यात तोडण्यात आला होता,मे महिन्यात पुलाचे म्हणजे उन्हाळ्यातच काम सुरु झाले. काम सुरु झाल्यानंतर कंपनीने मुख्य पूल तोडून त्याच्या बाजूला वाहतुकीला पर्याय व्यवस्था म्हणून दुसरा रपटा (वळण रस्ता) तयार करून दिला. दोन महिन्यात या पुलाचे पिल्लर सुध्दा पूर्ण झाले नसून अजूनही या पुलाचे पन्नास टक्के सुध्दा काम झाले नाही. अशातच रविवारी व सोमवारी झालेल्या रिमझिम पावसामुळे सदर नाल्याला पूर आला. यात कंत्राटदार कंपनीने पर्याय व्यवस्था म्हणून तयार केलेला रपटा (रस्ता) वाहून गेला त्यामुळे मुकूटबन पाटण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
 या मार्गाने होणारा तेलंगणा व पांढरकवडा तालुक्यांतील थेट संपर्क आता तुटला आहे. त्यामळे आता एखाद्या व्यक्तीला मुकूटबन वरून पाटण जायचे असेल तर रुईकोट, मांगली किंवा शेकापुर मार्गे झरी जामणी वरून पाटण ला जावे लागत आहे. पाटण येथूनच पांढरकवडा व तेलंगणात जाता येते. तूर्तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी नागरिकांची मागणी आहे.
लिंगटी येथील नाल्यावरील रपटा पुरात गेला वाहून लिंगटी येथील नाल्यावरील रपटा पुरात गेला वाहून Reviewed by सह्याद्री चौफेर on July 06, 2022 Rating: 5
Powered by Blogger.