"विरांगणनेंच्या पाठीवर कौतुकाची थाप" रवि घुमे पुणे हून लिहीतात.

सह्याद्री चौफेर | न्यूज 

पुणे : म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता. मुळशी येथे पासिंग आऊट परेड व चित्तथरारक सैनिकी प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डाॅ.सुहास दिवसे,आयुक्त, महानगर विकास प्राधिकरण, सी.ए.श्री.योगेश दीक्षित कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषणजी गोखले (निवृत्त) संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्री राजीवजी सहस्त्रबुद्धे,नियामक मंडळ सदस्या व शालासमिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे, सदस्य श्री.बाबासाहेब शिंदे, अॅड. श्री.सागर नेवसे,संस्थेचे सचिव श्री भरत व्हनकटे ,सहाय्यक सचिव श्री सुधीर गाडे,शालासमिती महामात्रा ,प्रा.चित्रा नगरकर,प्रा.सुधीर भोसले,प्रा.शैलेश आपटे, शाळेच्या प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या उपस्थितीत झाला, शानदार संचलनानंतर इयत्ता १२ वी ची पासिंग आऊट परेड झाली,त्यानंतर प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला,यात लेझिम,योगासन, मर्दानी खेळ,रोप मल्लखांब, धनुर्विद्या,रायफल शुटिंग, हाॅर्स रायडिंग व कराटे यांचा समावेश होता, याप्रसंगी "टाकाऊतून टिकाऊ "या संकल्पनेनुसार विमान शिल्प ,एन.सी.सी कक्ष व आर्ट वाॅल चे उद्घघाटन ही प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले.
 Sword Of Honour हा पुरस्कार कु.वृंदा पवार व उत्कृष्ट विद्यार्थिनी हा पुरस्कार साक्षी टेकवडे हिला मिळाला, उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादरीकरणाचा पुरस्कार रायफल शुटिंग ला मिळाला मार्गदर्शन आॅनररी कॅप्टन (निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे यांनी केले. राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी कु.देवयानी चव्हाण,गीता धनवडे व गिरिजा जोगळेकर तसेच शाळेला मदत करणारे चित्रकार श्री.विक्रम कुलकर्णी, शिल्पकार श्री.रोहन चंद्रचूड, वेल्डर श्री.सुनिल लोहार तसेच शैक्षणिक योगदानाबद्दल शाळेचे उप मुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी,सौ.मंजिरी पाटील, श्री.रविंद्र उराडे ,सौ.वैशाली शिंदे या शिक्षकांना ही सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सुहास दिवसे यांनी पासिंग आऊट परेड व मुलींची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून भारावून गेल्याचे सांगितले तर अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल श्री.भूषणजी गोखले (निवृत्त) यांनी कोरोनाच्या आपत्तीनंतर प्रात्यक्षिकांचे सुंदर सादरीकरण केल्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे ही कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.माधवी मेहेंदळे, सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी केले तर उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री.संदीप पवार व सैन्यप्रशिक्षण विभागप्रमुख हवालदार श्री.गजानन माळी व सर्व सैनिकी परिवार यांनी केले. कार्यक्रमानंतर प्रशालेत सैनिकी व शालेय शिक्षण घेत असलेल्या सर्व विरांगनांना दिवसभराकरीता पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
             
कोवीडमुळे निर्माण झालेला अनेक अडचणींची धग इथेही दिसून आली. पालक आणि पाल्यांच्या भेटीसंदर्भात शाळेला नियोजन करतांना सुचना वारंवार बदलाव्या लागल्यामुळे पालकात संभ्रम निर्माण झाला. व त्यामुळे काही पालकांमधे कमालीचा रोष दिसून आला.

मात्र "विरांगणनेंच्या पाठीवर कौतुकाची थाप" रवि घुमे पुणे हून लिहीतात.

जूनोणी येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या


निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

वणी : वणी उपविभागीय क्षेत्रात आत्महत्याचे सत्र कायम दिसून येत आहे. कधी मारेगाब तर कधी वणी आता तर झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुनोनी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केलेली घटना उघडकीस आली. त्यामुळे उपविभाग सह संपूर्ण जिल्हा हदरून गेला आहे. 

गणेश जयराम आस्वले (37) असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव असून यवतमाळ जिल्ह्यामद्ये आत्महत्येचे सत्र सुरूच आहे, गणेशने आपली जीवन यात्रा का संपवली हे अद्याप ही स्पष्ट झाले नाही आहे. मात्र, गणेश च्या आत्महत्याने आस्वाले परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

गणेश च्या पाठीमागे आई, पत्नी व दोन मुले कुणाल आणि दिनेश असा आप्त परिवार आहे. वडील आधीच मरण पावल्याने संपूर्ण घरच्यांची जबाबदारी गणेश वर होती, त्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असावी अशी चर्चा एकण्यात येते.

विष प्राशन केलेल्या गणेश याला वणी येथे रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला नागपूर येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.

पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.

सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी 29 जून 2022 पर्यंत हरकती किंवा सूचना पाठविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी केले आहे.

या हरकती किंवा सूचना दि. २९ जून, २०२२ अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ यांच्याकडे टपालाद्वारे अथवा dycomm inspection@mah.gov.in या ई-मेल वर नोंदविण्यात याव्यात. यासंदर्भातील अधिसूचनेचा मसूदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संकेतस्थळ http://stateexcise.maharashtra.gov.in  येथे तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रकाशित करण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात आता ब्लॉकचेन प्रणालीद्वारे जात प्रमाणपत्रे निर्गमित होणार

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मुंबई : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व गडचिरोली जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नाने गडचिरोली जिल्ह्यात जात प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे जात प्रमाणपत्रांची नक्कल, खोटी प्रकरणे रोखण्यास मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र स्टार्टअप वीक विजेत्या लेजीटडॉक (LegitDoc) या स्टार्टअपची नियुक्ती करण्यात आली आहे.

सध्या डिजिटल स्वाक्षरी केलेली जात प्रमाणपत्रे नागरिकांना महाऑनलाइन पोर्टलद्वारे जारी केली जातात. तथापि, बहुसंख्य लोक सोयीच्या दृष्टीने जात प्रमाणपत्रे कागदी प्रिंटच्या स्वरूपात बाळगतात आणि यामुळे छापील कागदांवरील डिजिटल स्वाक्षरी प्रमाणित करणे शक्य होत नाही. डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रमाणपत्रे जारी करूनही आज जात प्रमाणपत्रांची नक्कल आणि खोटी प्रकरणे निदर्शनास येतात. हे टाळण्यासाठी आता ब्लॉकचेन प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पॉलीगॉन POS तंत्रज्ञानाचा वापर करून जात प्रमाणपत्रे ब्लॉकचेन प्रणालीद्वारे प्रमाणित करता येणार आहेत. प्रत्येक जात प्रमाणपत्रावरील महत्त्वाचे तपशील पॉलीगॉन POS ब्लॉकचेन सिस्टीमद्वारे क्रिप्टोग्राफिक QR कोड स्वरुपात दर्शविले जातील. या QR कोडद्वारे शासकीय विभाग अथवा इतर कोणत्याही कार्यालयांना या प्रमाणपत्राची पडताळणी व सत्यता सत्यापित करणे शक्य होणार आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली उपविभागात राबविला जात असून मोठ्या प्रमाणात आदिवासी लोकसंख्या असलेल्या एटापल्ली आणि भामरागडमधील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह, गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मीना, सहायक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली एटापल्ली उपविभाग कार्यालयाच्या अधिपत्याखालील सुमारे 65 हजार जात प्रमाणपत्रांची माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे. पुढील एका महिन्यात जात प्रमाणपत्रांचा सर्व डेटा ब्लॉकचेन प्रणालीमध्ये भरला जाणार आहे. QR कोड असलेली ब्लॉकचेन-सक्षम जात प्रमाणपत्रे जिल्ह्यातील सामायिक सेवा केंद्रांद्वारे (Common Service Centre) नागरिकांना प्राप्त करता येतील.

याबाबत श्री. कुशवाह म्हणाले की, भारतातील काही सर्वात मोठ्या स्टार्टअप्सच्या यशोगाथांचे मूळ महाराष्ट्रात आहे, ज्या की आज जागतिक स्तरावरही यशस्वी ठरत आहेत. महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहांतर्गत विजेत्या ठरलेल्या स्टार्टअप्सना त्यांच्या उत्पादन, सेवेच्या प्रकल्पांची शासनाच्या विविध विभागांबरोबर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्यासाठी 15 लाख रुपयांचे कार्यालयीन आदेश देण्यात येतात. हा उपक्रम प्रशासनात नाविन्यता आणण्यात मोठी भूमिका बजावत आहे, असे त्यांनी सांगितले. 

सहायक जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले की, या नावीन्यपूर्ण यंत्रणेमुळे अनुसूचित जाती आणि जमातींसाठी असलेल्या कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्रांच्या गैरवापरास आळा बसेल. येणाऱ्या काळात जिल्हा प्रशासनद्वारे नवीन प्रमाणपत्रे ब्लॉकचेनद्वारे निर्गमित केले जातील.

लेजीटडॉक (LegitDoc) स्टार्टअपचे सहसंस्थापक नील मार्टिस म्हणाले की, प्रशासनात नाविन्यता आणण्यासाठी महाराष्ट्र शासन ई-गव्हर्नन्स उपक्रमांमधे वेब/ब्लॉकचेनसारख्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याची बाब अतिशय महत्वकांक्षी व लक्षणीय आहे. अशा उपक्रमांमुळे येणाऱ्या काळात आमुलाग्र सकारात्मक बदल दिसतील.

ब्लॉकचेन प्रणालीद्वारे निर्गमित केलेल्या कोणत्याही कागदपत्रांची सत्यता अवघ्या 10 सेकंदांत सत्यापित करता येते. कुठल्याही प्रकारच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यासाठी आज जागतिक स्तरावर ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे.

अवघ्या पाच दिवसांवर भीम जयंती

रवि घुमे | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : अवघ्या पाच दिवसांवर आंबेडकर जयंती  येऊन ठेपली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मारेगाव येथील जयभिम उत्सव समिती च्या वतीने भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

११ ते १४ एप्रिल दरम्यान चारदिवशीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवास्थान परिसरात प्रबोधनकार भिमेश भारती यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वाली चा कार्यक्रम रंगणार आहे.
       (जाहिरातीसाठी संपर्क : 7218187198)

१३ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता धम्मराजिका बुद्ध विहार येथे स्त्रीमुक्ती व डॉ आंबेडकर या विषयावर प्रमुख वक्ते किशोर चहांदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता "हम भीम के दिवाने" या बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. १४ एप्रिलला विश्वरत्न डॉ आंबेडकर यांना अभिवादन व सायंकाळी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.