रवि घुमे | सह्याद्री चौफेर
मारेगाव : अवघ्या पाच दिवसांवर आंबेडकर जयंती येऊन ठेपली आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मारेगाव येथील जयभिम उत्सव समिती च्या वतीने भीम जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
११ ते १४ एप्रिल दरम्यान चारदिवशीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निवास्थान परिसरात प्रबोधनकार भिमेश भारती यांचा बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कव्वाली चा कार्यक्रम रंगणार आहे.
१३ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता धम्मराजिका बुद्ध विहार येथे स्त्रीमुक्ती व डॉ आंबेडकर या विषयावर प्रमुख वक्ते किशोर चहांदे यांचे मार्गदर्शन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता "हम भीम के दिवाने" या बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित केला आहे. १४ एप्रिलला विश्वरत्न डॉ आंबेडकर यांना अभिवादन व सायंकाळी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.
अवघ्या पाच दिवसांवर भीम जयंती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
April 07, 2022
Rating:
