जूनोणी येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या


निकेश पत्रकार | सह्याद्री चौफेर 

वणी : वणी उपविभागीय क्षेत्रात आत्महत्याचे सत्र कायम दिसून येत आहे. कधी मारेगाब तर कधी वणी आता तर झरी तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जुनोनी येथील एका शेतकऱ्याने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केलेली घटना उघडकीस आली. त्यामुळे उपविभाग सह संपूर्ण जिल्हा हदरून गेला आहे. 

गणेश जयराम आस्वले (37) असे विष प्राशन करून आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव असून यवतमाळ जिल्ह्यामद्ये आत्महत्येचे सत्र सुरूच आहे, गणेशने आपली जीवन यात्रा का संपवली हे अद्याप ही स्पष्ट झाले नाही आहे. मात्र, गणेश च्या आत्महत्याने आस्वाले परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

गणेश च्या पाठीमागे आई, पत्नी व दोन मुले कुणाल आणि दिनेश असा आप्त परिवार आहे. वडील आधीच मरण पावल्याने संपूर्ण घरच्यांची जबाबदारी गणेश वर होती, त्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली असावी अशी चर्चा एकण्यात येते.

विष प्राशन केलेल्या गणेश याला वणी येथे रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्याला नागपूर येथे हलवण्यात आले. उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला.

पुढील तपास मुकुटबन पोलीस करीत आहे.
जूनोणी येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या जूनोणी येथील युवा शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या Reviewed by सह्याद्री चौफेर on April 07, 2022 Rating: 5
Powered by Blogger.