मारेगाव मैत्री कट्टा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन


सह्याद्री न्यूज | रवि घुमे 

मारेगाव : शहरात येत्या ९ मार्च २०२२ रोजी मारेगाव "मैत्री कट्टा" तर्फे जल्लोष खास महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये आपल्या क्षितिजा पलीकडे बघण्याचा दृष्टीकोन वृद्धींगत व्हावा व महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने स्पर्धेत ९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य महिला सांस्कृतिक रॅलीचेही आयोजन करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.

यामध्ये सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७००१, द्वितीय ५००१ तर, ३००१ तिसरे पारितोषिक आहे. यासाठी २५१ रुपये प्रवेश फी आकारण्यात येईल.

युगल नृत्य स्पर्धेत प्रथम ४००१, दुसरे ३००१ तर तिसरे २००१ पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याकरिता १५१ रुपये प्रवेश फी आहे. एकल नृत्य स्पर्धेत प्रवेश फी १०१ रुपये असून प्रथम पारितोषिक ३००१, द्वितीय २००१ तर १००१ तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी आयोजकाकडून नृत्य स्पर्धेचा वेळ केवळ तीन मिनिटाचा आहे. ही नृत्य स्पर्धा ३० वर्षावरील महिलांकरिता आहे. समूह नृत्य स्पर्धेत कमीतकमी सहा महिला असाव्यात. स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख ७ मार्च २०२२ आहे. होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनिताताई खैरे व सरीताताई वानखेडे यांचे सोबत संपर्क साधावा.

१० मार्च रोजी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात होणार आहे. स्पर्धेत सहभागी महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी नगरसेविका व विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिलांना गौरविण्यात येणार आहे. तालुक्यातील महिलांनी विविध वेषभूषा, नृत्यस्पर्धा सहभाग घ्यावा असे आवाहन "मैत्री कट्टा" च्या वतीने करण्यात आले आहे.

मोची मादिगा मादगी मादरू महासंघाची वणी तालुका व शहर कार्यकारणी गठीत


सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 

वणी : वणी तालुक्यातील लालगुडा येथे मादगी समाजाची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून या कार्यक्रमात समाजातील दिगज्यांची उपस्थिती होती त्यात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडीत सांगितले की,समाज कोणत्याही प्रकारे पिछाडता कामी नये जोमाने कामी लागा आपण एकजूट होऊन पूर्ण पणे समाज घडविण्याकरिता प्रयत्न करू असे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले. 
     
दिनांक 28,02,2022 सोमवार लालगुडा येथे वणी तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी M4 महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सोमेश्वर येलचेलवार, M4 महाराष्ट्र सल्लागार चरणदासजी कोंडावार, जेष्ठ समाजसेवक शितलजी कलवलवार, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल शंकावार, विदर्भ उपाध्यक्ष प्रभाकर लिक्केवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष M4 नत्थुजी नगराळे यांच्या विशेष उपस्थितीत सभा पार पडली यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करीत समाजाप्रती असलेली जान दाखवीत नवीन वणी तालुका तथा शहर कार्यकारिणीचीएकमताने घोषणा करण्यात आली. 
    
वरील मंडळींच्या विशेष उपस्थितीत वणी तालुका अध्यक्ष सुरज रमेश चाटे, कार्याध्यक्ष पदी नागेश मोहूर्ले, उपाध्यक्ष पदी राकेश शंकावार, सचिव पदी अरुण येनपल्लीवार, कोषाध्यक्ष पदी प्रमोद नगराळे, सहसचिव पदी अर्जुन शेंग्रपवार, तर शहर कार्यकारिणीत शहर अध्यक्षपदी विक्की मधुकर परगंटीवार, कार्याध्यक्ष पदी शिवकुमार नलभोगे, उपाध्यक्ष पदी रवी दुर्गाजी कोमलवार, सचिव पदी कैलास पोन्नलवार, सहसचिवपदी विशाल लिंगमपल्लीवार, कोषाध्यक्ष पदी संदेश नत्थुजी नगराळे तर कार्यकारी सदस्य म्हणून घनश्याम नगराळे यांची निवड करण्यात आली असुन सभेला मादगी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन नत्थुजी नगराळे यांनी तर आभार अरुण येनपल्लीवार यांनी मानले.

झरी जामणी तालुक्यात पोलीओ लसीकरण, प्रत्येक गावात सरपंच व पदाधिकारी कडून पोलिओ डोस पाजून उदघाटन!


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 

झरी : तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत रविवारी (ता.२७) ० ते ५ वर्षे वयोगटातील ४८३० नोंदणी बालकापैकी ४१४१ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आली एकूण ८६ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले.

तालुक्यातील प्रत्येक गावाला सरपंच व पदाधिकारी कडून प्रथम पोलिओ डोस पाजून उदघाटन करून सुरवात झाली. मुकूटबन येथे सरपंच मीनाताई आरमुरवार यांचे हस्ते लसीकरण ला सुरुवात झाली तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मांडवी येथे पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार कडून सुरुवात झाली. 

झरी तालूक्यात झरी (जामणी), शिबला व मुकूटबन असे ३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पोलिओ डोस पासून एक ही बालक वंचित राहू नये यासाठी तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी रुग्णवाहिकेत साऊंड सर्व्हिस लावून स्वतः प्रत्येक गावात रस्त्यावर उतरून शनिवारी प्रचार केला. प्राथमीक आरोग्य केंद्र झरी जामणी येथे १७०३ बालकापैकी १४७७ बालकांना ८८ टक्के, प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथे १०३६ बालकापैकी ८६६ बालकांना ८४ टक्के, प्राथमीक आरोग्य केंद्र मुकूटबन येथे २०९१ बालकापैकी १७९८ बालकांना ८६ टक्के, असे एकूण झरी जामणी तालुक्यात ४८३० अपेक्षीत बालकापैकी ४१४१ बालकाना पोलिओ लस देण्यात आली. अपेक्षित बालकांची ८६ टक्केवारी झाली.

तालुक्यात १२३ पोलिओ बूथ, २६४ कर्मचारी, पर्यवेक्षक, ३१ मोबाईल पथक ४ व फिरते पथक ५ कार्यरत होते. तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी आकस्मिक भेट देऊन बुथांची पाहणी करून पोलिओ डोस पासून एक ही बालक वंचीत राहू नये अश्या सूचना बुथ कर्मचाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लसीकरण सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू होते.

झरी (जामणी), मुकूटबन, शिबला, पाटण, माथार्जून व ईतर ठिकाणी बसस्टँड वर बूथ होते व प्रत्येक गावात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नितीन मनवर यांचे स्काऊट यांनी लहान मुलांना पोलिओचा लाभ दिला.

तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मुकूटबनचे वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, जीवन कुळमेथे, शिबलाचे वैद्यकीय अधिकारी ज्योती मगर यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. प्रत्येक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात फिरते पथक, मोबाईल पथक कार्यरत होते.

आज पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार देवटोक येथे, शिवपिंडीचे घेणार दर्शन व सामाजिक सभागृहाचे करणार भूमिपूजन


सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार

चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार आज दिनांक १ मार्च ला सुप्रसिद्ध असलेल्या देवटोक येथे उत्खननात सापडलेल्या नवीन शिव पिंडीचे दर्शन घेवून मंजूर केलेल्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनासाठी दुपारी १ वाजता येत आहेत.

महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नवीन मंदिर बांधकाम करीत असतांना उत्खननात पुरातन शिवपिंडी सापडली त्यामुळे त्या ठिकाणी भव्य शिव मंदिर निर्माण साठी शीला पूजन कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.

या ठिकाणी यापूर्वीसुद्धा पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन रस्त्यासाठी ६० लाख रुपये मंजूर केले होते त्याचप्रमाणे सामाजिक सभागृहासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्याचे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्याचप्रमाणे ते उत्खननात सापडलेल्या शिवपिंडीची सुद्धा दर्शन आणि पूजन करणार आहे.

महाशिवरात्री निमित्ताने मोठे भाविक या ठिकाणी येत असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. श्री पुण्यभूमी पुण्यभूमी मुरकुंडेश्वर देवस्थान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. संत श्री मुरलीधर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सदर ट्रस्ट काम करत असून यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कोविड नियमांचे पालन करून या महाशिवरात्री कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

राशिभविष्य (दि. ०१ मार्च २०२२)

           राशिभविष्य (दि. ०१ मार्च २०२२)
राशिभविष्य
मेष
मेष : कौतुकास्पद कार्य कराल, आरोग्य उत्तम असेल, कुटुंबाला वेळ द्याल, सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हाल, व्यावहारिकदृष्ट्या लाभदायक दिवस.

राशिभविष्य
वृषभ
वृषभ : धार्मिक उपासना आवश्यक आहे, नियमांचे पालन आवश्यक आहे, सरकारी कामांना प्राधान्य द्या, निर्णय घेताना घाई नको.

राशिभविष्य
मिथुन
मिथुन : उष्णतेचे विकार बळावतील, संभ्रमावस्था होईल, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, वरिष्ठांशी मतभेद होतील, संयमाने वागावे.
राशिभविष्य
कर्क
कर्क : कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल.सामंजस्याने प्रश्‍न सोडवाल, आपापसात सुसंवाद साधाल.व्यावसायिकांना लाभदायक दिवस.
राशिभविष्य
सिंह
सिंह : सज्जनांचा सहवास लाभेल. शत्रूंवर मात कराल, हितचिंतकांकडून सहकार्य लाभेल, नोकरदारांसाठी जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या : गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. प्रेम-प्रकरणांमध्ये अपयश संभवते. वाद-विवादापासून दूर राहावे, आरोग्याच्या तक्रारी संभवतात.
राशिभविष्य
तुळ
तुळ : जमिनींच्या कामांमध्ये अडचणी येतील, नावलौकिक सांभाळावा लागेल, वाहने सावकाश चालवावीत. आर्थिकदृष्ट्या नुकसानकारक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक : मित्रमंडळींबरोबर दिवस आनंदात जाईल. आत्मविश्‍वास निर्माण होईल. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील, आर्थिक परिस्थिती सुधारेल.
राशिभविष्य
धनु
धनु : वादग्रस्त विधानामुळे त्रास होईल, शब्द मागे घ्यावा लागेल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे, आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
राशिभविष्य
मकर
मकर : प्रसन्नता लाभेल, आवडत्या व्यक्‍तींचा सहवास लाभेल, मनासारख्या घटना घडतील, कृतज्ञता व्यक्‍त कराल, व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
कुंभ
कुंभ : वात-पित्ताचे त्रास होतील, मानसिक व आर्थिक ताणतणाव निर्माण होतील, आत्मचिंतनाची गरज, कोणालाही जामीन राहू नका.
राशिभविष्य
मीन
मीन : मित्रमंडळींच्या सहवासाने आनंददायी दिवस जाईल. वैवाहिक समस्यांचे निराकरण होईल, आर्थिक प्रगती होईल.

– पं. प्रसाद जोशी