सह्याद्री न्यूज | योगेश मडावी
झरी : तालुक्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अंतर्गत रविवारी (ता.२७) ० ते ५ वर्षे वयोगटातील ४८३० नोंदणी बालकापैकी ४१४१ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आली एकूण ८६ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले.
तालुक्यातील प्रत्येक गावाला सरपंच व पदाधिकारी कडून प्रथम पोलिओ डोस पाजून उदघाटन करून सुरवात झाली. मुकूटबन येथे सरपंच मीनाताई आरमुरवार यांचे हस्ते लसीकरण ला सुरुवात झाली तर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मांडवी येथे पंचायत समिती सभापती राजेश्वर गोंड्रावार कडून सुरुवात झाली.
झरी तालूक्यात झरी (जामणी), शिबला व मुकूटबन असे ३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. पोलिओ डोस पासून एक ही बालक वंचित राहू नये यासाठी तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी रुग्णवाहिकेत साऊंड सर्व्हिस लावून स्वतः प्रत्येक गावात रस्त्यावर उतरून शनिवारी प्रचार केला. प्राथमीक आरोग्य केंद्र झरी जामणी येथे १७०३ बालकापैकी १४७७ बालकांना ८८ टक्के, प्राथमिक आरोग्य केंद्र शिबला येथे १०३६ बालकापैकी ८६६ बालकांना ८४ टक्के, प्राथमीक आरोग्य केंद्र मुकूटबन येथे २०९१ बालकापैकी १७९८ बालकांना ८६ टक्के, असे एकूण झरी जामणी तालुक्यात ४८३० अपेक्षीत बालकापैकी ४१४१ बालकाना पोलिओ लस देण्यात आली. अपेक्षित बालकांची ८६ टक्केवारी झाली.
तालुक्यात १२३ पोलिओ बूथ, २६४ कर्मचारी, पर्यवेक्षक, ३१ मोबाईल पथक ४ व फिरते पथक ५ कार्यरत होते. तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांनी आकस्मिक भेट देऊन बुथांची पाहणी करून पोलिओ डोस पासून एक ही बालक वंचीत राहू नये अश्या सूचना बुथ कर्मचाऱ्यांना दिल्या. आरोग्य विभागाच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. लसीकरण सकाळी ८ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू होते.
झरी (जामणी), मुकूटबन, शिबला, पाटण, माथार्जून व ईतर ठिकाणी बसस्टँड वर बूथ होते व प्रत्येक गावात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, नितीन मनवर यांचे स्काऊट यांनी लहान मुलांना पोलिओचा लाभ दिला.
तालुका आरोग्य अधिकारी मोहन गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली मुकूटबनचे वैद्यकीय अधिकारी अरविंद वानखेडे, जीवन कुळमेथे, शिबलाचे वैद्यकीय अधिकारी ज्योती मगर यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. प्रत्येक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात फिरते पथक, मोबाईल पथक कार्यरत होते.
झरी जामणी तालुक्यात पोलीओ लसीकरण, प्रत्येक गावात सरपंच व पदाधिकारी कडून पोलिओ डोस पाजून उदघाटन!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 01, 2022
Rating:
