आज पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार देवटोक येथे, शिवपिंडीचे घेणार दर्शन व सामाजिक सभागृहाचे करणार भूमिपूजन
सह्याद्री न्यूज | उमेश गोलेपल्लीवार
चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विजय वडेट्टीवार आज दिनांक १ मार्च ला सुप्रसिद्ध असलेल्या देवटोक येथे उत्खननात सापडलेल्या नवीन शिव पिंडीचे दर्शन घेवून मंजूर केलेल्या सामाजिक सभागृहाच्या भूमिपूजनासाठी दुपारी १ वाजता येत आहेत.
महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे नवीन मंदिर बांधकाम करीत असतांना उत्खननात पुरातन शिवपिंडी सापडली त्यामुळे त्या ठिकाणी भव्य शिव मंदिर निर्माण साठी शीला पूजन कार्यक्रम सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे.
या ठिकाणी यापूर्वीसुद्धा पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट देऊन रस्त्यासाठी ६० लाख रुपये मंजूर केले होते त्याचप्रमाणे सामाजिक सभागृहासाठी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्याचे भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्याचप्रमाणे ते उत्खननात सापडलेल्या शिवपिंडीची सुद्धा दर्शन आणि पूजन करणार आहे.
महाशिवरात्री निमित्ताने मोठे भाविक या ठिकाणी येत असल्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. श्री पुण्यभूमी पुण्यभूमी मुरकुंडेश्वर देवस्थान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. संत श्री मुरलीधर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली सदर ट्रस्ट काम करत असून यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून कोविड नियमांचे पालन करून या महाशिवरात्री कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
आज पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार देवटोक येथे, शिवपिंडीचे घेणार दर्शन व सामाजिक सभागृहाचे करणार भूमिपूजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 01, 2022
Rating:
