सह्याद्री न्यूज | कुमार अमोल
वणी : वणी तालुक्यातील लालगुडा येथे मादगी समाजाची तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून या कार्यक्रमात समाजातील दिगज्यांची उपस्थिती होती त्यात उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडीत सांगितले की,समाज कोणत्याही प्रकारे पिछाडता कामी नये जोमाने कामी लागा आपण एकजूट होऊन पूर्ण पणे समाज घडविण्याकरिता प्रयत्न करू असे यावेळी उपस्थितांनी बोलून दाखविले.
दिनांक 28,02,2022 सोमवार लालगुडा येथे वणी तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी M4 महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख सोमेश्वर येलचेलवार, M4 महाराष्ट्र सल्लागार चरणदासजी कोंडावार, जेष्ठ समाजसेवक शितलजी कलवलवार, यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल शंकावार, विदर्भ उपाध्यक्ष प्रभाकर लिक्केवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष M4 नत्थुजी नगराळे यांच्या विशेष उपस्थितीत सभा पार पडली यावेळी सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करीत समाजाप्रती असलेली जान दाखवीत नवीन वणी तालुका तथा शहर कार्यकारिणीचीएकमताने घोषणा करण्यात आली.
वरील मंडळींच्या विशेष उपस्थितीत वणी तालुका अध्यक्ष सुरज रमेश चाटे, कार्याध्यक्ष पदी नागेश मोहूर्ले, उपाध्यक्ष पदी राकेश शंकावार, सचिव पदी अरुण येनपल्लीवार, कोषाध्यक्ष पदी प्रमोद नगराळे, सहसचिव पदी अर्जुन शेंग्रपवार, तर शहर कार्यकारिणीत शहर अध्यक्षपदी विक्की मधुकर परगंटीवार, कार्याध्यक्ष पदी शिवकुमार नलभोगे, उपाध्यक्ष पदी रवी दुर्गाजी कोमलवार, सचिव पदी कैलास पोन्नलवार, सहसचिवपदी विशाल लिंगमपल्लीवार, कोषाध्यक्ष पदी संदेश नत्थुजी नगराळे तर कार्यकारी सदस्य म्हणून घनश्याम नगराळे यांची निवड करण्यात आली असुन सभेला मादगी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, कार्यक्रमाचे संचालन नत्थुजी नगराळे यांनी तर आभार अरुण येनपल्लीवार यांनी मानले.
मोची मादिगा मादगी मादरू महासंघाची वणी तालुका व शहर कार्यकारणी गठीत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 01, 2022
Rating:
