सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : शहरात येत्या ९ मार्च २०२२ रोजी मारेगाव "मैत्री कट्टा" तर्फे जल्लोष खास महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांमध्ये आपल्या क्षितिजा पलीकडे बघण्याचा दृष्टीकोन वृद्धींगत व्हावा व महिलांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा या प्रमुख उद्देशाने स्पर्धेत ९ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता भव्य महिला सांस्कृतिक रॅलीचेही आयोजन करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकातून सांगण्यात आले आहे.
यामध्ये सामूहिक नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७००१, द्वितीय ५००१ तर, ३००१ तिसरे पारितोषिक आहे. यासाठी २५१ रुपये प्रवेश फी आकारण्यात येईल.
युगल नृत्य स्पर्धेत प्रथम ४००१, दुसरे ३००१ तर तिसरे २००१ पारितोषिक ठेवण्यात आले आहे. याकरिता १५१ रुपये प्रवेश फी आहे. एकल नृत्य स्पर्धेत प्रवेश फी १०१ रुपये असून प्रथम पारितोषिक ३००१, द्वितीय २००१ तर १००१ तृतीय पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी आयोजकाकडून नृत्य स्पर्धेचा वेळ केवळ तीन मिनिटाचा आहे. ही नृत्य स्पर्धा ३० वर्षावरील महिलांकरिता आहे. समूह नृत्य स्पर्धेत कमीतकमी सहा महिला असाव्यात. स्पर्धा प्रवेशाची अंतिम तारीख ७ मार्च २०२२ आहे. होणाऱ्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अनिताताई खैरे व सरीताताई वानखेडे यांचे सोबत संपर्क साधावा.
१० मार्च रोजी स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात होणार आहे. स्पर्धेत सहभागी महिलांना प्रोत्साहनपर बक्षिसासह प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यावेळी नगरसेविका व विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या महिलांना गौरविण्यात येणार आहे. तालुक्यातील महिलांनी विविध वेषभूषा, नृत्यस्पर्धा सहभाग घ्यावा असे आवाहन "मैत्री कट्टा" च्या वतीने करण्यात आले आहे.
मारेगाव मैत्री कट्टा तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 01, 2022
Rating:
