सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : काव्यांगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्था शाखा गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने काव्यमैफिल आयोजित करण्यात आली हाेती.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान काव्यांगण साहित्य समुहाच्या राज्य सल्लागारच्या कुसुम ताई अलाम यांनी विभूषित केले त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले की गडचिरोली जिल्हाच्या साहित्यिकांची मोठी जबाबदारी आहे. हा जिल्हा विविध कारणाने जळतो आहे. आपल्या जिल्ह्यातील समस्या वेगळी आहे. हे लेखणीतून उतरले जावे. या जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जावा असे लेखक कलावंत येथे आहेत. आपल्या लेखणीला अधिक धारदार बनवले गेले पाहिजे. काव्यांगणचे जिल्हाध्यक्ष अशोक मांदाडे यांच्या पुढाकाराने व सर्वांच्या सहकार्याने काव्य मैफिलचा कार्यक्रम यशस्वी झाला याप्रसंगी निरज आत्राम (राष्ट्रीय संस्थापक कार्याध्यक्ष) यांचा गडचिरोली शाखेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मारोती आरेवार, जितेंद्र रायपुरे, उपेंद्र रोहनकर प्रतिक्षा पि.कोडापे, प्रेमिला अलोणे, सुधाताई चौधरी, पुरुषोत्तम लेनगुरे, हरिदास कोटरंगे, पुरुषोत्तम ठाकरे, शरद गायकवाड, नयन निकोडे यांनी या वेळी काव्य वाचन केले.
विज्ञान,युवकांच्या प्रातिनिधिक स्वरूपातील, शेती, महिला अस्तित्व, हिंसा, सावित्री माई फुले, बाबासाहेब भीमराव, परिवर्तन, प्रबोधनशिल अशा सामाजिक आशयाच्या अनेक प्रकारच्या कविता या वेळी सादर झाल्या. सदरहु कार्यक्रम प्रसंगी नरेंद्र निकोडे, किर्ती निकोडे, मंगला मांदाडे, विजया मांदाडे, निरुपम मांदाडे आदीं उपस्थित होते. काव्य मैफिलचे संचालन अशोक मांदाडे यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार नयन निकोडे यांनी मानले.
कार्यक्रमाला गडचिराेलीतील बरेच श्राेते उपस्थित हाेते.
गडचिराेलीत काव्य मैफीलचा कार्यक्रम संपन्न !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 01, 2022
Rating:
