थोर महापुरुषांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज व पुढील पिढीला घडवावे - डॉ.सतीशभाऊ वारजूकर

सह्याद्री न्यूज | विलास पिसे

चिमूर : आज दिनांक ५/१/२०२२ ला चिमूर विधानसभा क्षेत्रातील आदिवासी माना जमात माँ मानिकादेवी महिला व पुरुष मंडळ,व आदिवासी माना जमात विद्यार्थी युवा संघटना,विदर्भ ग्राम शाखा आंबेनेरी यांच्या संयुक्त विद्यमाने नागदिवाळी उत्सव २०२२ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना आपले ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समनव्यक तथा चंद्रपुर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर, पंचायत समिती उपसभापती रोषनभाऊ ढोक, माजी मंत्री डॉ.रमेशजी गजभे, ग्राम पंचायत सरपंच आंबेनेरी संदीप दोडके, माजी जि. प.सदस्य विजयजी घरत, बोरगांव बुटी सरपंच रामदासजी चौधरी, प्रा.दिनकरजी चौधरी, पवनभाऊ बंडे, एकनाथजी भुते सर, माजी सैनिक तुकारामजी नंनावरे, माजी पोलीस पाटील दयारामजी मुंढरे, संदीप घोडमारे, संजयजी घोडमारे, सूरज घोडमारे, सदाशिव दोडके, अरुण गरमकळे, मनोहर बारेकर,व गांवकरी मंडळी उपस्थित होते.
 

मूर्ती येथे सावित्रीच्या भुमिकेत शिरल्या सावित्रीच्या लेकी !


सह्याद्री न्यूज | मनिष मंगरूळकर

राजुरा : जि. प. उच्च प्राथ शाळा मूर्ती, पं. स. राजुरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात 'बालिका दिन' विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त भाषणाने उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कल्पनाताई कोडापे, सदस्या, शा.व्य. समिती मूर्ती, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. ममताताई लांडे, अंगणवाडी सेविका, मूर्ती या होत्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन कु. संजीवनी संतोष टेकाम हिने, तर आभार प्रदर्शन कु. संजीवनी ईश्वर पिपरे हिने मोठ्या आत्मविश्वासाने केले.

आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मूर्ती येथील जि. प. शाळेतील सावित्रीच्या लेकी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत शाळेत आल्या आणि स्वयंप्रेरणेने स्वयंशासन दिन साजरा करून या आद्यशिक्षिकेला प्रत्यक्ष भुमिका साकारून मानाचा मुजरा केला, हे विशेष.



तथागत गौतम बुद्धांचे विचार मानवी जीवनासाठी प्रेरणादायी – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

सह्याद्री न्यूज नेटवर्क | 

चंद्रपूर : तथागत गौतम बुध्द यांनी जगाला प्रेम, करूणा, शांती, मानवी मुल्ये आणि अहिंसेचा विचार दिला आहे. आजही तथागतांच्या या विचारांची गरज असून मानवी जीवनासाठी त्यांचे विचार सदैव प्रेरणादायी आहे, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

ब्रम्हपूरी येथील देलनवाडी, शांती नगर येथे असलेल्या विहारात गौतम बुध्दांच्या मुर्तीचे अनावरण करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मारोतराव कांबळे तर प्रमुख उपस्थितांमध्ये ब्रम्हपूरीच्या नगराध्यक्षा रिता उराडे, उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, डॉ. एस. के. गजभिये, डॉ. देवेश कांबळे, प्राध्यापक राजेश कांबळे, डॉ. भारत गणवीर, जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, विलास विखार, सम्यक महिला मंडळाच्या अध्यक्षा करूणा बोदेले, हर्षा नगराळे आदी उपस्थित होते.

तथागतांच्या मुर्तीचे अनावरण करतांना अतिशय आनंद होत आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, गौतम बुध्दांच्या विचारांची देशाला आज नितांत गरज आहे. अहिंसेच्या मार्गाने वाटचाल करण्याची प्रेरणा तथागतांच्या विचारातून मिळते. मूर्ती अतिशय तेजोमय असून त्याची भव्यता आणि दिव्यता मुर्तीकडे पाहिल्यावर येते. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारून शोषित, पिडीत, दलितांसाठी संपूर्ण आयुष्य झिजविले. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा घेण्याची गरज आहे.

विहार हे केवळ पुजेचे स्थान नाही तर विचारातून समाज घडविण्याचे ते एक केंद्र आहे. डॉ. बाबासाहेबांनी नेहमी पुस्तकांना जपले. त्यामुळे या विहाराच्या बाजूला मोकळ्या जागेत पुस्तकांचे दालन तयार करावे. मुलांना घडविण्यासाठी पुस्तकांची नितांत गरज आहे. ज्ञानाची आणि पुस्तकांची भूक असली की पोटाची भूक भागवता येते. त्यामुळे येथील वाचनालयासाठी निधी देण्यात येईल. तसेच या परिसराच्या विकासासाठी कुठेही निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्र्यांच्या हस्ते या कामांचे झाले भुमिपूजन

वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ब्रम्हपुरी शहरातील नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयाच्या बाजुला जलतरण तलावाचे (स्विमींग पुल) बांधकाम करणे, उद्यान विकसित करून सुशोभीकरण करणे (9 कोटी 50 लक्ष रुपये) तसेच विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले.

यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत ब्रम्हपुरी शहरातील प्रभाग क्र. 5 मध्ये विविध ठिकाणी सिमेंट रस्ते, नाल्या बांधकाम करणे व विद्युत पोल उभारणी करणे (40 लक्ष रुपये), प्रभाग क्र.6 मध्ये स्वागत मंगल कार्यालयाच्या मागे विविध ठिकाणी सिमेंट रस्ते, नाल्या बांधकाम करणे व विद्युत पोल उभारणी करणे (47 लक्ष रुपये), प्रभाग क्र.7 मध्ये ग्रामीण रुग्णालयाजवळ विविध ठिकाणी नाली बांधकाम करणे व विद्युत पोल उभारणी करणे (1 कोटी 8 लक्ष), प्रभाग क्र. 8 मध्ये गुरुदेव नगर हनुमान मंदिर जवळ विविध ठिकाणी नाली बांधकाम करणे (39 लक्ष रुपये) या कामांचा समावेश आहे.

यावेळी नगरसेवक डॉ नितीन उराडे, महेश भर्रे, हितेंद्र राऊत, प्रितीश बुरले, नगरसेविका सुनीता तिडके, नगरसेविका वनीता अलगदेवे, निलीमा सावरकर, मंगला लोनबले, योगिता आमले, मुन्ना रामटेके आदी उपस्थित होते.

शेत शिवारात मिळाले अजगराला जीवदान


सह्याद्री न्यूज|  विलास पिसे

चिमूर : मौजा नेरी पासून २ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चिखली या परिसरामध्ये रेखा ताराचंद बोरसरे यांच्या शेतामध्ये भल्ला मोठा साप आढळून आला.

सविस्तर असे की,मुलगा प्रशांत बोरसे आणि त्यांची पत्नी दोघे शेतात तुरीची कापणी करत असताना प्रशांत यांची पत्नी पारिवर तुरीची पेंडीजमा करीत का असताना त्यांना एक भलामोठा अजगर साप दिसला. बघताच त्या भयभीत झाल्या आणि त्यांनी आपल्या पतीला याची माहिती दिली. बोरसे हे भयभीत न होता लगेच नेरी येथील सर्पमित्र मुन्ना शेख यांना शेतामध्ये पाचारण करण्यात आले. सर्पमित्र शेखच्या माध्यमातून भल्यामोठ्या अजगराला त्यांनी पकडलं आणि त्याला जीवदान दिलं.

यावेळी मुन्ना शेख यांनी सांगितले की, हा अजगर आपला भक्ष्य शोधण्यासाठीच याठिकाणी शेत शिवारात आला असावा. काम करीत असताना काळजी घेऊन च काम करावी. असे कसे साप आढळून आल्यास आम्हाला कळवावे, आम्ही या अजगराला आणि इतर अनेक विषारी सापाला ताडोबाच्या जंगलामध्ये सोडत असतो. हा अजगर साप सुद्धा उद्या ताडोबाच्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे असे सर्पमित्र शेख यांनी सांगितले. दरम्यान, अजगराला पाहण्यासाठी बघ्यांची गावात एकच गर्दी उसळली होती 

ओव्हरलोड वाहतूकीने वनोजा देवी रस्त्याची झाली दयनीय अवस्था


सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे 

मारेगाव : तालुक्यात सर्रास ओव्हरलोड वाहतूक सुरू असून क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या वाहतुकीमुळे रस्त्याची वाट लागली आहे. मारेगाव तालुक्यातील वनोजा (देवी) व आपटी येथील रेती घाटातून ओव्हरलोड रेतीची वाहतूक मुळे देवी वनोजा मार्ग उखडून गेला असतांनाही संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर वनोजा ग्रामस्थांनी मारेगाव तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन वनोजा देवी मार्गाने ओव्हरलोड वाहतूक थांबवावी किंबहुना दहा ते पंधरा फूट रुंदीचा रस्ता आधी तयार करावा अशी मागणी करण्यात आली.

आता आपटी येथील रेती घाटाचा लिलाव होत असून यापुढे रेती भरून ओव्हरलोड वाहने सदर रस्त्याने जाऊन सध्याच्या परिस्थिती पेक्षाही या रोडची पुन्हा दुर्दशा होणार आहे. शिवाय आपटी घाटावरून रेतीचे चालणाऱ्या ओव्हरलोड ट्रक, ट्रॅकटर, हायवामुळे संपूर्ण रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून या मार्गावर ठिकठिकाणी भल्ले खड्डे पडले असून या मार्गाने नागरिकांना प्रवास करण्याकरिता मोठी तारेवरची कसरत करावी लागतेय. मोठी अडचण निर्माण झाली असून दैनंदिन येरजाऱ्या करणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांचा सदर खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही निवेदनातून म्हटले आहे. पुढे असेही नमूद केले की, गावातील बिमार व्यक्तीला शहराचे ठिकाणी घेवुन जाणे अतिशय कठीण बाब झाली आहे. 
रेतीसह ओव्हरलोड वाहतूक सुरु असून क्षमतेपेक्षा अती जास्त वजन नेणाऱ्या वाहनांवर धडक कार्यवाही करावी. अतीजास्त वजनाचा माल ट्रकांमध्ये वाहून नेला जातो. त्यामुळे वनोजा देवी या दोन किमी पर्यंतचा रस्ता हा दहा ते पंधरा फूट रुंदी चा तयार करून द्यावा. अशी येथील गावाकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा आम्ही गावकरी घाटावरून रेती भरून येणारी वाहने अडवून चक्का जाम करु असा इशाराच दिला आहे.

आज रोजी निवेदन देताना मनसे विभाग प्रमुख रोशन शिंदे, यांच्यासह विठ्ठल ढोके, प्रशांत बोढे, प्रवीण राजूरकर, सुधाकर धांडे, गौरव नगराळे, राजू मत्ते, मनोहर दारुणकर, विलास बरडे, भूषण वैद्य, संदीप बरडे, रामकृष्ण राजूरकर, रोशन आस्वले, पांडुरंग राजूरकर, राजेंद्र मिलमिले यांची उपस्थित होती.