सह्याद्री न्यूज | मनिष मंगरूळकर
राजुरा : जि. प. उच्च प्राथ शाळा मूर्ती, पं. स. राजुरा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात 'बालिका दिन' विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त भाषणाने उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कल्पनाताई कोडापे, सदस्या, शा.व्य. समिती मूर्ती, तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ. ममताताई लांडे, अंगणवाडी सेविका, मूर्ती या होत्या. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन कु. संजीवनी संतोष टेकाम हिने, तर आभार प्रदर्शन कु. संजीवनी ईश्वर पिपरे हिने मोठ्या आत्मविश्वासाने केले.
आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मूर्ती येथील जि. प. शाळेतील सावित्रीच्या लेकी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत शाळेत आल्या आणि स्वयंप्रेरणेने स्वयंशासन दिन साजरा करून या आद्यशिक्षिकेला प्रत्यक्ष भुमिका साकारून मानाचा मुजरा केला, हे विशेष.
मूर्ती येथे सावित्रीच्या भुमिकेत शिरल्या सावित्रीच्या लेकी !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
January 05, 2022
Rating:
