मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करा - सीमा स्वामी लोहराळकर


सह्याद्री न्यूज नेटवर्क | 
नांदेड, (२ आक्टो.) : चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यासह आठही जिल्ह्यात पिके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक नैसर्गिक आपत्तीने नेस्तोनाबूत केले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या या पहिल्या आठवड्यातील दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, मुंग, उडीद, भुईमूग सह आदी पिके नामशेष झाली आहेत तर, तर कापूस, मका, उस, मोसंबी, बाजरीचे पीक आडवी पडले. शेतकऱ्यांच्या शेतात कमरेच्या वर पाणी साचले असून आहे ते पिवळे पडले. नदी, नाले दुथडी वाहत आहे. अनेक ठिकाणी पाझर तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे उभे पिके वाहून गेली आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सामना करावा लागला आहे. काही ठिकाणी पिके वाहून गेली पंचनामे पूर्ण झाली नाहीत. अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने पंचनामे तरी कशाचे करणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे पंचनामे न करता शासनाने त्वरित मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहिर करून सरसकट आर्थिक मदत करत शासनाने प्रत्येक शेतकऱ्यांना ५०,०००/- हजार रुपयांची मदत जाहीर करावी असे महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार जन विरोधी आक्रोश मोर्चा च्या नांदेड जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहाराळकर मुख्यमंत्री यांना केली आहे.

नितेश कराळेचा नागपूरात निषेध, संताजी ब्रिगेडची नंदनवन पाेलिस स्टेशल रिपोर्ट दाखल

सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर, (०१ सप्टें.) : तेली समाजाचे मानचिन्ह असलेल्या "तेलघाना" ची विडंबना व्यंगचित्राच्या माध्यमांतुन सोशल मीडीयावर नितेश कराळे व गणेश वानखेडे यांनी (प्रसारीत) केली. त्या निषेधार्थ नागपूर संताजी बिग्रेड तेली समाज महासभेच्या वतीने संत जगनाडे महाराज चौकात काल त्यांचा या कृत्याचा जाहीर निषेध करुन नंदनवन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात आली.

या वेळी प्रामुख्याने अजय धोपटे संस्थापक, गजानन तळेकर हीतेश बावनकुळे, मंगेश साकरकर ,कुमार बावनकर, प्रतिभा खोब्रागडे, कविता रेवतकर चित्राताई माकडे, कु. कल्याणी सरोदे, नर्मदा तडस, मनीषा करवडकर, सुषमा पाटील ,डॉ. लीना मेंढेकर, वंदना ढोबळे,नंदा येवले, सुनील अवचट, अजय माकडे, चंदू वैद्य, शिवा उपरकर, किशोर माकडे, व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

करंजखेड येथे वीज पडून बैलांचा व बकरी चा मृत्यू


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (०१ आक्टो.) : महागांव तालुक्यातील करंजखेड शेत शिवारामध्ये 3:30 वाजता चे दरम्यान, माणिक देवराव ठाकरे यांचे शेतामध्ये असलेल्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे करंजखेड ते कासारबेहळ रोड वर करंजखेड शिवारात एका बकरीचा ही विज पडून मृत्यू झाल्याचे समजते.


माणिक ठाकरे व किसन पवार यांनी माजी पं.स सदस्य संदीप पाटील ठाकरे यांना मोबाईल द्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता, संदीप ठाकरे यांनी संबंधित महसूल विभाग व तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांना कळविले असता, घटनास्थळी महसूलचे तलाठी अनिल खडसे यांनी येऊन पंचनामा करून डॉ मुसळे यांनी पोस्टमार्टम केले. यामध्ये शेतकऱ्यांच्या बैलाची किंमत अंदाजे 40 ते 45 हजार रुपये असून किसन पवार यांच्या बकरी ची किंमत अंदाजे 12 ते 13 हजार रुपये असल्याचे कळतेय. तरी प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे. 01 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान करंजखेड शेत शिवारात तर काही भागात विजेच्या गडगडटासह पाऊस झाला.

या दरम्यान, करंजखेड येथील एक बैल व पाचशे मिटरच्या अंतरावर आसलेली एक बकरी चा वीज पडल्याने जागीच ठार झाली. यामध्ये माणिक ठाकरे व किसन पवार या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.

चंद्रपूरात सुरु असलेल्या डेरा आंदोलनातील कामगार अखेर जिंकले


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०१ आक्टो.) : प्रलंबित पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील 235 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अंदाजे 500 कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालेला आहे. मागील सोळा महिन्यापासून कामगारांचे सात महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे फेब्रुवारी 2021 पासून कामगारांनी काम बंद करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुलं-बाळ व कुटुंबासह डेरा आंदोलन सुरू केले होते. वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने कामगारांचे थकीत पगार देण्याऐवजी त्यांच्या जागेवर नवीन कंत्राटी कामगारांची भरती केली.या विरोधात वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत दर्शना झाडे,सविता दुधे,माधुरी खोब्रागडे व निशा हनुमंते या कामगारांनी चंद्रपूरच्या औद्योगिक न्यायालयामध्ये स्थगिती आदेश मिळवण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयामध्ये जवळपास तीन महिन्यापासून या अर्जावर नियमित सुनावणी सुरू होती.संपूर्ण डेरा आंदोलनाचे भवितव्य या प्रकरणाच्या निकालावर अवलंबून होते. अखेर दिनांक 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान न्यायालयाने या प्रकरणांमध्ये स्थगिती दिली.कामगाराचे थकीत वेतन एक महिन्याच्या आत न्यायालयात जमा करण्यात यावे तसेच सर्व कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे असे आदेश सुध्दा न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालयाला दिलेले आहेत.
कामगारांना ज्यादिवशी पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात येईल त्या दिवशी डेरा आंदोलन मागे घेऊन अशी प्रतिक्रिया डेरा आंदोलना मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषद मध्ये जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.

अत्यल्प शुल्क घेऊन अॅड. प्रशांत खंजाची व अॅड. मोहन निब्रड यांनी न्यायालयात कामगारांचा किल्ला लढविला. त्यांचे ज्युनियर अॅड.मोहन निब्रड यांनी सुद्धा पूर्ण ताकदिनिशी कामगारांची बाजू मांडली.एडवोकेट दीपक चटप यांनी वेळोवेळी कामगारांना कायदेशीर सहकार्य केले.
कामगारांचा दुर्दम्य इच्छाशक्तीचा अंगावर शहारे आणणारा संघर्ष

इंदिरानगर येथे राहणाऱ्या आशिष वाढई या कंत्राटी कामगारांची मागील चार दिवसांपासून वीज कापल्याने त्याचे संपूर्ण कुटुंब अंधारात राहत आहे.अनेक कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरले नाही,भाड्याने राहणाऱ्या कामगारांच्या मागे घर मालकांचा तगादा, जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी अनेक किराणा व्यावसायिकाकडून उधारी वर किराणा मिळवून दिला परंतु प्रत्येक ठिकाणी उधारी वाढल्यानंतर होणारी अडचण, कोविड आपत्तीमध्ये काही कामगारांचे कुटुंबातील सदस्यांचे उपचाराअभावी झालेले मृत्यू तसेच आर्थिक तणावामुळे प्रदीप खडसे त्यांची पत्नी व संगीता पाटील या तिन कामगारांचे झालेले मृत्यू,वादळ वारा पाऊस झेलत कधी हल्ला बोल आंदोलन, कधी अमित देशमुख गो बॅक आंदोलन असे अनेक आंदोलने करून गुन्हे अंगावर घेणारे कामगार असा मागील आठ महिन्यांपासून अंगावर शहारे आणणारा थरारक अनुभव असतानाही कामगार मात्र, आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत वारंवार बैठका घेऊनही तांत्रिक अडचणीचे कारण सांगून कामगारांच्या हक्काचे वेतन नाकारण्यात आले. अखेर न्यायालयाने न्याय दिला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा विजय झाला अशी प्रतिक्रिया या आंदोलनातील आंदोलनकर्त्या कामगारांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

पांचाळा गावातील गांव तलावात गेलेल्या जमिनीचा तातडीने मोबदला द्या -राजु झोडेंची मागणी


सह्याद्री न्यूज | किरण घाटे 
चंद्रपूर, (०१ आक्टो.) : चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील पांचाळा या गावातील शेतकऱ्यांची जमीन पाझर तलावांमध्ये गेलेली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची जमीन या तलावात गेली त्यांना अजूनपर्यंत मोबदला मिळालेला नाही. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही मोबदला न मिळाल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे
यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी पुनर्वसन अधिकारी व महसूल अधिकारी यांच्याशी चर्चा करून मोबदला तात्काळ देण्याची आज मागणी केली.
   
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प योजनेअंतर्गत ६०.१३ लक्ष रुपये खर्च करून जलसंधारण विभाग चंद्रपूर यांचे मार्फत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामास सुरुवात झालेली आहे. सदरहु तलावाचे बांधकाम सुरु असताना बहुतांशी जमीन सरकारी असल्याचे व पूर्णपणे पडीत असल्याचे सरपंच यांनी प्रशासनास सांगितले. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षस्थळी भेट दिली असता ती जमीन काही शेतकऱ्यांची असल्याचे माहिती मिळाली. जमीन गेलेल्या अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मोबदल्याची मागणी केलेली होती.

संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर मोबदला मिळेल असे आश्वासन दिले होते परंतु अजून पावेतो कोणत्याही प्रकारचा मोबदला सदरहु शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्यामुळे जमीन गेलेले शेतकरी हवालदिल झाले असून तात्काळ जमिनीचा मोबदला देण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांच्या नेतृत्वात पुनर्वसन अधिकारी व महसूलचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंधित विषयावर सविस्तर चर्चा करून तात्काळ मोबदला देण्याची मागणी केली.
   
उपराेक्त शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्यात यावा अन्यथा उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू झोडे व शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासनास दिला आहे.