करंजखेड येथे वीज पडून बैलांचा व बकरी चा मृत्यू


सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के 
महागांव, (०१ आक्टो.) : महागांव तालुक्यातील करंजखेड शेत शिवारामध्ये 3:30 वाजता चे दरम्यान, माणिक देवराव ठाकरे यांचे शेतामध्ये असलेल्या एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर दुसरीकडे करंजखेड ते कासारबेहळ रोड वर करंजखेड शिवारात एका बकरीचा ही विज पडून मृत्यू झाल्याचे समजते.


माणिक ठाकरे व किसन पवार यांनी माजी पं.स सदस्य संदीप पाटील ठाकरे यांना मोबाईल द्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता, संदीप ठाकरे यांनी संबंधित महसूल विभाग व तालुका पशु वैद्यकीय अधिकारी यांना कळविले असता, घटनास्थळी महसूलचे तलाठी अनिल खडसे यांनी येऊन पंचनामा करून डॉ मुसळे यांनी पोस्टमार्टम केले. यामध्ये शेतकऱ्यांच्या बैलाची किंमत अंदाजे 40 ते 45 हजार रुपये असून किसन पवार यांच्या बकरी ची किंमत अंदाजे 12 ते 13 हजार रुपये असल्याचे कळतेय. तरी प्रशासनाने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी नागरिकांतून मागणी होत आहे. 01 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान करंजखेड शेत शिवारात तर काही भागात विजेच्या गडगडटासह पाऊस झाला.

या दरम्यान, करंजखेड येथील एक बैल व पाचशे मिटरच्या अंतरावर आसलेली एक बकरी चा वीज पडल्याने जागीच ठार झाली. यामध्ये माणिक ठाकरे व किसन पवार या शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे.
करंजखेड येथे वीज पडून बैलांचा व बकरी चा मृत्यू करंजखेड येथे वीज पडून बैलांचा व बकरी चा मृत्यू Reviewed by सह्याद्री चौफेर on October 01, 2021 Rating: 5
Powered by Blogger.