वेकोली उपप्रबंधकाची चालाखी वाहन चालकाने दिली कबुली

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वेकोलि उकणी खाणीतून भंगार चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी उपप्रबंधक व वाहन चालक या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील उकणी कोळसा खाणीतून कोळसा खाणीच्या यांत्रिकी उपप्रबंधक अनुप कुमार साही यांच्या सांगण्यावरून वाहन चालक अतुल गजानन पिदूरकर यांनी भंगार वाहणात लोड करून विकायला आणले गेलेले भंगार एम.एस.एफ. च्या जवानांनी पकडले व शिरपूर ठाण्यात जमा केले.
या प्रकरणाची पोलिसात तक्रार उकणी व जुनाड कोळसाखाणीचे उपक्षेत्रीय प्रबंधक ओमप्रकाश विनायक फुलारे यांनी यांनी केली, शिरपूर पोलिसांनी त्यांच्या गुन्हा दाखल केला. यांचेकडून अंदाजे दोन लाख 85 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पुढील तपास ठाणेदार माधव शिंदे करीत आहे.
वेकोली उपप्रबंधकाची चालाखी वाहन चालकाने दिली कबुली वेकोली उपप्रबंधकाची चालाखी वाहन चालकाने दिली कबुली Reviewed by सह्याद्री चौफेर on November 28, 2024 Rating: 5
Powered by Blogger.