सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : 76 वणी विधानसभा मतदारसंघात व देशपातळीवर प्रादेशिक विषमता आणि दुसरी शेतकऱ्यांमधील विषमता, हे संरचनात्मक बदल आणि त्याचें अनेकविध परिणाम लक्षात घेऊन,सी पी आयची लढाई केंद्रस्थानी ठेऊन शेतकी क्रांतीची लढाई सुरु असून समजून ती लढाई लढण्यासाठी मतदात्यांनी क्रांती केली पाहीजे, समस्या आपल्या आहे, तीच खरी क्रांती असून ती लढाई तेवत ठेवण्याची गरज असल्याचे मत मतदात्यासी बोलताना कॉ. अनिल घनश्याम हेपट यांनी मांडले.
''जमीनदारी पूर्णपणे नष्ट करणे आणि भुमिहीन आणि अल्पभूधारकांना जमिनीचे वाटप करणे ही शेतकरी क्रांतीची मध्यवर्ती घोषणा असली पाहिजे. या घोषणेचा आपण प्रचार केला पाहिजे,'' मात्र आज राज्याच्या व देशाच्या अनेक भागात असलेली परिस्थिती बघता या गोष्टीवर कृती करणे कठीण आहे. ती पूर्ण करण्यासाठी आपली उमेदवारी आहेत. अर्थात ही घोषणा केंद्रस्थाणी ठेवून, वरकस जमीन, बेमानी जमिनी आणि पडीक जमिनीच्या प्रश्नावरील संघर्ष सुरू ठेवावेच लागतील. त्याच सोबत शेतमृत मजुराच्या वेतनाचा प्रश्न, घराच्या जागेचा प्रश्न,भाडे कपात, 75 टक्के उत्पादन बटईदारांना देणे, जमिनीतून बेदकल करणे सरसकट किंवा किमान अंशिक कर्जमाफी, शेतमाला रास्त भाव, स्वस्त कर्ज, कराचे ओझे कमी करणे, पाणी बिल, वीजदर यासारख्या शुल्कात कपात, जमीनदाराच्या गुंडाचे पोलिसाच्या संगणमताने किंवा थेट मदतीने हल्ले, दलितावरील सामाजिक हत्याचार, प्रशासनातील भ्रष्टाचार इत्यादी प्रश्न विचारण्याची गरज असताना आपली उमेदवारी मी का नाही दाखल करायची, कारण की हे अशी मुद्दे आहेत की, ज्यांचा गरीब, मध्यम, श्रीमंत या शेतीकरी वर्गातील सर्वच घटकावर परिणाम होतो. हे प्रश्न उचलले तर हे सर्व घटक चळवळीमध्ये ओढले जाऊ शकतात. तोच खरा लढा या सर्व प्रवाहाना एकत्र आणून शेतमजूर आणि गरीब शेतकरी यांच्या भोवती केंद्रित असलेली शेतीकरीवर्गाची जास्तीत जास्त एकजूट निर्माण करावी लागेल जेणेकरून संख्येने कमी असलेल्या जमीनदार वर्गाला एकटे पाडता येईल.
शेतकरी व येथील बहुजन वर्ग हा विस्कटीत झाला आहे, हेच हेरून ते राजकीय सत्ता हिस्कवत आले, हेच ते स्वातंत्र्य असून, समस्या सोडवणूक उपाय करण्या पेक्षा धार्मिक राजकारण करून भाग्यावर बोंबा मारीत फिरवीत आहे. हे थांबवणे ही राष्ट्र गरज झाली असून, त्या लढायचे आपण पण पाईक व्हा, असे विचार मंथन कॉ. अनिल घनश्याम हेपट यांनी व्यक्त ले.
केंद्रस्थानी ठेवून शेतकी क्रांतीची सिपी आयची लढाई: कॉ.अनिल हेपट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 16, 2024
Rating: