सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : 15 नोव्हेंबर रोजी शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर मशाल या चिन्हावर रिंगणात उभे असून तालुक्यात मार्डी, कुंभा,बोटोणी सर्कलमध्ये तुफान प्रचार दौरा सुरु आहे. शुक्रवारी प्रचार दौरा अरुणा खंडाळकर, वसंत आसुटकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. सकाळी गौराळा, वरुड, आकापूर, लाखापूर, वनोजा देवी, हिवरा, कानोडा, शिवणी, पार्डी, चनोडा, चोपण, मार्डी, खैरगांव, चिंचमंडळ, कोथुर्ला, बोरी गदाजी, कुंभा, धरमपोड, गोगुलधरा, खैरगाव, वाघदरा, वसंतनगर, सराटी, खंडणी भुरकी (पोड), रोहपट आदी गावागावत फिरून सायंकाळी १० दहा वाजता मैसदोडका, या ठिकाणी जाणार आहे. अनेक गावामध्ये नागरिकांनी संजय देरकर यांचे जंगी स्वागत, सत्कार, अतिशबाजी फोडून व औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. असंख्य नागरिकांसह प्रचाराने संजय देरकर यांच्या कडे चांगलेच लक्ष वेधले जात आहे. भाऊंच्या पाठीशी मतदार संघातील महाविकास आघाडीची संपूर्ण पलठण सामील झाले.
संजय देरकर यांनी सुरुवाती पासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. तरुण मतदारांसोबतच महिला वर्गही संजय देरकर यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत आहे. प्रचारासाठी शिवसेना तथा काँग्रेस कार्यकर्त्यांची एक फौज उभी आहे. अतिशय नियोजनबद्द प्रचार सुरु असल्याने संजय देरकर विधानसभा निवडणुकीत नक्कीच विजयाच्या दिशेने पाऊल आहेत. वणी विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी या पूर्वी निवडून दिलेल्या उमेदवारकाडुन परिणाम सुद्धा पाहायला मिळत आहे. यावेळी अरुणा खंडाळकर, वसंत राव आसूटकर, मारोती गौरकार, सुनील कातकडे, संजय निखाडे, राजू तुरणकर, डीमन टोंगे, अरुण नक्षणे, अंकुश माफूर, नाना डाखरे, पांडुरंग लोहे, रवी पोटे, पुरुषोत्तम बुचे, सचिन पचारे आदी धडाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मतदार संघ पिंजून काढत आहे.
संजय देरकर यांचा मारेगाव तालुक्यात झंझावात दौरा
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 16, 2024
Rating: