सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
भाजप महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचारार्थ मारेगाव तालुक्यातील गाव भेटी दरम्यान नागरिकांनाकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक उमेदवार वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. यात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी गाव भेटी तून बैठकींकडे लक्ष केंद्रित केले असून, ते दौरे, कॉर्नर सभा व बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात या बैठकांचे आयोजन केले जात असून, या बैठकींमधून त्यांचा १० वर्षाच्या कार्यकाळातील कामे सांगितली जात आहेत. गावांना भेटी देत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत असताना ग्रामस्थांच्या अपेक्षा, समस्या व प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.
मतदारसंघात आ. बोदकुरवार यांना गाव भेटीत उदंड प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 15, 2024
Rating: