लोकसभेचा पॅटर्न वणी विधानसभेत घडणार, संजय देरकरांना जनसामान्यांचा पाठिंबा

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : 17 नोव्हेंबरला दुपारी 1 ते 5 वाजे पर्यंत वणी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ शहरात भव्य शक्तीप्रदर्शन पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. उद्याची पदयात्रा ही लक्षनीय ठरणार अशी आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे.

मतदारसंघातील निवडणूकीला आता तीन दिवस शिल्लक आहे. या होऊ घातलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) पक्षाचे संजय निळकंठ देरकर हे अधिकृतरित्या रिंगणात आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा निवडणुकीचा आखाडा होणार आहे. अशी एकच चर्चा आता रंगत असताना महाविकास आघाडीचे सर्व नेते व घटक पक्ष व हितचिंतक त्यांच्या उद्या रविवारी होणाऱ्या विशाल शक्तिप्रदर्शन पदयात्रेत हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वामनराव कासावार, टिकाराम कोंगरे, आशिष खुलसंगे, मोरेश्वर पावडे, देवीदास काळे, डॉ.महेंद्र लोढा, अरुणा खंडाळकर, मारोती गौरकार, राजु भाऊ येलट्टीवार, घनश्याम पावडे, मंगल मडावी, राकेश खुराणा, ओम ठाकूर, शालिनी रासेकर, शामा तोटावार, या जनाधार असलेल्या तर शिवसेनेच्या वतीने संजय निखाडे, दीपक कोकास, सुनिल कातकडे, संतोष माहुरे, शरद ठाकरे, रवी बोढेकर, योगिता मोहोड, डिमन टोंगे, वनिता काळे, गीता उपरे, राजु तुरणकर, प्रकाश कऱ्हाड, अजिंक्य शेंडे, अनिल राजूरकर, मधुकर वरहडकर, राष्ट्रवादी विजय नगराळे, आबिद हुसेन, सूर्यकांत खाडे, समाजवादी चे रज्जाक पठाण, काम्रेड पक्षाचे दिलीप परचाके, कुमार मोहरपुरी, प्रविण आत्राम गोंडवाना पक्षाचे, अजय धोबे सह सर्वांनी मोठ्या संख्येने या पदयात्रेत सामील होऊन परिवर्तनाचा आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले आहे.

लोकसभेचा पॅटर्न वणी विधानसभेत घडणार, संजय देरकरांना जनसामान्यांचा पाठिंबा लोकसभेचा पॅटर्न वणी विधानसभेत घडणार, संजय देरकरांना जनसामान्यांचा पाठिंबा Reviewed by सह्याद्री चौफेर on November 16, 2024 Rating: 5
Powered by Blogger.