आश्वासन दिल्यानंतर मजुरांचे पगार मागणीचे आंदोलन मागे घेण्यात आले


सह्याद्री न्यूज | योगेश मडावी 
झरी, (ता.२१) : मुकुटबन येथे आर.सी.सी.एल.या कंपनीचे बांधकाम चालू आहे. हे बांधकाम मागील तीन वर्षांपासुन काम चालू असुन, या बांधकामचे विविध छोट्या- मोठ्या कंपनीने कॉन्ट्रॅक्ट घेतलेले असुन यातीलच एक कंपनी हाजी बाबा इन्फ्रा व बिल्डमेंट या कंपनीने देखील ठेका घेतला आहे.

मात्र, हाजी बाबा इन्फ्रा ही कंपनीने गेल्या ४ महिन्यापासून कामगारांचे  वेतन दिले नाही. या पार्श्वभूमीवर दि. २१ जुन २०२१ रोजी मुकुटबन येथील आर.सि.सि.पि.एल कंपनी गेट क्र. १ च्या समोर कामगारांनी वेतन मागणीसाठी आंदोलन छोडण्यात आले असून, हाजी बाबा इन्फ्रा या कंपनीच्या छोटया ठेकेदारांनी धरणे आंदोलन करून कामगारांचे थक बाकी असलेले पगार ताबडतोब करण्याची मागणी केली.

या मागणीला आज शिव क्रांती कामगार संघटनेने पाठींबा देऊन कामगाराचे लवकरात लवकर पगार करा अशी मागणी केली असता, आर.सी. सी.पी.एल.कपंनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी  आंदोलनाला भेट देउन तीन-चार दिवसात कामगारांची मागणी पूर्ण करू असे, आश्वासन दिल्यानंतर पगार  मागणीचे आंदोलन यावेळी मागे घेण्यात आले.
आश्वासन दिल्यानंतर मजुरांचे पगार मागणीचे आंदोलन मागे घेण्यात आले आश्वासन दिल्यानंतर मजुरांचे पगार मागणीचे आंदोलन मागे घेण्यात आले Reviewed by सह्याद्री चौफेर on June 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.