सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२१) : वणी पोस्ट ऑफिस मधील वरच्या मजल्यावर एका कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज २१ जूनला दुपारच्या सुमारास उघडकीस आली. शिंदोला पोस्ट ऑफिसमध्ये क्लर्क असलेला सदर कर्मचारी वणी पोस्ट ऑफिसमध्ये कार्यालयीन कामाकरिता आला होता. पोस्ट ऑफिसच्या वरच्या मजल्यावर बसून बाकी राहिलेले काम पूर्ण करतो म्हणाला, पण खूप वेळ होऊनही तो खाली न आल्याने त्याच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी वर जाऊन बघतले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. बबन उर्फ ओंकार काशिनाथ पाचभाई वय अंदाजे ४३ वर्ष रा. विठ्ठलवाडी असे या गळफास घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. शहरातील विठ्ठलवाडी परिसरात राहणारा ओंकार पाचभाई हा शिंदोला पोस्ट ओफिसमध्ये क्लर्क या पदावर कार्यरत होता. तालुक्यातील पोस्ट ऑफिसचे मुख्य कार्यालय वणी असल्याने तो काही कार्यालयीन कामाकरिता वणी पोस्ट ऑफिसला आला होता. वरच्या मजल्यावर बसून कामे आटपवतो असे म्हणून तो पोस्ट ऑफिसच्या वरच्या मजल्यावर गेला. पण खूप वेळ होऊनही तो खाली न आल्याने काही सहकारी कर्मचारी वरच्या मजल्यावर गेले असता तेथे तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. परिसरात कुणाशीही जास्त संपर्क न ठेवणारा व कुटुंबातच नेहमी वेळ घालवणारा तसेच लहान भावासोबतच मित्रासारखा वावरणारा ओंकार सर्वांना सोडून गेल्याची बातमी परिसरात धडकताच परिसरातील नागरिकांना दुःखद धक्का बसला. कुटुंबियांना तर विश्वासच बसत नव्हता की, ओंकार असाही टोकाचा निर्णय घेऊ शकेल. त्याच्या जीवनत्यागाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने आत्महत्या केल्याने कुटूंब पार हादरलं आहे. पत्नीच्या अश्रूचा बांध थांबता थांबत नव्हता. सुरुवातीपासूनच सुखी कुटुंबाचा वारसा लाभलेल्या पाचभाई कुटुंबातील ओंकार याने आत्महत्या का केली असावी, ही एकच चर्चा परिसरात सुरु आहे. शासकीय सेवेत असलेला ओंकार पाचभाई याचा सुखात संसार सुरु होता. पत्नी व दोन मुले असे या सुखी संसाराचे वारसदार होते. या सर्वांनाच सोडून तो कायमचा निघून गेला. त्याने हा टोकाचा निर्णय का बरं घेतला, हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पोलिस तपासात काय ते निष्पन्न होईल.
शिंदोला पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने वणी पोस्ट ऑफिसमध्ये घेतला गळफास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 21, 2021
Rating:
