पेट्रोल डिझेल गॅस व आवश्यक वस्तूची महागाई नियंत्रणात आणावी - वंचित बहुजन आघाडीची मागणी

सह्याद्री न्यूज | संतोष कुळमेथे 
बल्लारपूर, (ता.२१) : संपूर्ण भारतात केंद्र सरकारने व महाराष्ट्र सरकारने अनेक कर जिझिया करा प्रमाणे कोरोना महामारीने त्रस्त जनतेवर लादण्यात आल्याने जनता मेटाकुटीस आली आहे.

 पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, गॅस व आवश्यक वस्तूवर भरमसाठ दरवाढ करून उद्योगपती जनतेला सर्सास लुटत आहे. केंद्र व राज्य सरकारने यास मुक समंती दिल्ली हाय की काय? केंद्र व राज्य सरकार जनतेला देशोधडीला लावण्याचे कारस्थान करत तर नाही ना ? यावर वंचित बहुजन आघाडी च्या वतीने लादलेली महागाई त्वरित नियंत्रणात आणावी अशी मागणी करण्यात येत आली, अन्यथा वंचित बहुजन आघाडी उग्र जन आंदोलन उभारेल अशा आशयचे निवेदन बल्लारपूर तहसीलदार देण्यात आले.
यावेळी वंचित चे नेते राजू भाऊ झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, सचिन ठीपे, स्वप्नील सोनटक्के, प्रथम दूपारे, निलजय गावंडे, गुंजन वानखेडे, प्रदीप झामरे, गौतम रामटेके, महेंद्र निवलकर, स्नेहल साखरे, भगत सिंघ झगडा उपस्थित होते.
पेट्रोल डिझेल गॅस व आवश्यक वस्तूची महागाई नियंत्रणात आणावी - वंचित बहुजन आघाडीची मागणी पेट्रोल डिझेल गॅस व आवश्यक वस्तूची महागाई नियंत्रणात आणावी - वंचित बहुजन आघाडीची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on June 21, 2021 Rating: 5
Powered by Blogger.